गुन्हा

यो यो हनी सिंग’ला सायबर सेलचा दणका 2 तास चौकशी; नेमकं प्रकरण काय?

Yo Yo Honey Singh
8

Yo Yo Honey Singh : आपल्या अतरंगी आणि हटके रॅप साँग्सने तरुणाईला वेड लावणारा प्रसिद्ध गायक-रॅपर यो यो हनी सिंह पुन्हा एकदा मोठ्या कायदेशीर अडचणीत सापडला आहे. बॉलिवूडमध्ये एकामागून एक हिट गाणी देणारा हनी सिंग नेहमीच त्याच्या गाण्यांमधील शब्दांमुळे वादाच्या भोवऱ्यात राहिला आहे. पण, यावेळेस वाद केवळ गाण्यापुरता मर्यादित नसून, थेट पोलिसांच्या चौकशीपर्यंत पोहोचला आहे. मुंबईतील महाराष्ट्र सायबर सेलच्या कार्यालयात हनी सिंगची तब्बल दोन तासांपेक्षा जास्त वेळ कसून चौकशी करण्यात आली. लागोपाठ तीन समन्स धुडकावून लावल्यानंतर शेवटी हनी सिंगला आपल्या वकिलांसह सायबर सेलच्या अधिकाऱ्यांसमोर हजर व्हावे लागले. पण नक्की असं काय घडलं की सायबर पोलिसांना थेट हनी सिंगला नोटीस पाठवून मुंबईत बोलवावं लागलं? त्याच्यावर नेमके काय आरोप आहेत? हा संपूर्ण प्रकार नेमका काय आहे? आणि या चौकशी दरम्यान काय घडलं?

हनी सिंगची सायबर सेलमध्ये २ तास चौकशी ( Yo Yo Honey Singh )

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात होते जानेवारी २०२६ मध्ये. देशाची राजधानी दिल्ली येथे हनी सिंगचा ( Honey Singh ) एक मोठा लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. या कॉन्सर्टला हजारो तरुणांची प्रचंड गर्दी होती. या लाईव्ह शो दरम्यान, स्टेजवर परफॉर्म करत असताना हनी सिंगने प्रेक्षकांशी संवाद साधायला सुरुवात केली. पण हा संवाद साधताना त्याचा तोल सुटला. त्याने उपस्थित तरुण प्रेक्षकांसमोर महिलांबद्दल अत्यंत अभद्र, अश्लील आणि अक्षेपार्ह भाषेचा वापर केला. त्याने काही अशा टिप्पण्या केल्या ज्या कोणत्याही समाजात महिलांचा अवमान करणाऱ्या मानल्या जातात. लाईव्ह कॉन्सर्टमध्ये उपस्थित असलेल्या काही लोकांनी या विधानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला. पाहता पाहता हा व्हिडिओ इंटरनेटवर वाऱ्यासारखा पसरला आणि सोशल मीडिया युजर्सने हनी सिंगला प्रचंड ट्रोल करायला सुरुवात केली. एका बाजूला त्याचे चाहते त्याचे समर्थन करत होते, तर दुसऱ्या बाजूला महिला संघटना आणि सामान्य नागरिकांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला.

LIVE कॉन्सर्ट मध्ये हनी सिंग यांने म्हटलं होतं कि दिल्लीच्या थंडीत कारमध्ये लैंगिक संबंध करायला मज्जा येते, तरुणांनी थंडीत लैंगिक संबंध करा, असं हनी सिंग याने कार्यक्रमात बोललं होतं

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या. पण या प्रकरणाला कायदेशीर वळण मिळाले जेव्हा एका जागरूक महिला तक्रारदाराने थेट महाराष्ट्र सायबर सेलकडे याविरोधात रीतसर तक्रार नोंदवली. तक्रारीत असा आरोप करण्यात आला की, हनी सिंग हा एक अत्यंत प्रसिद्ध सार्वजनिक चेहरा आहे. त्याचे कोट्यवधी फॉलोअर्स आहेत, ज्यात अल्पवयीन मुलांचा आणि तरुणांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. अशा अत्यंत लोकप्रिय गायकाने सार्वजनिक मंचावरून महिलांचा अवमान करणारी, अश्लील आणि अश्लाघ्य भाषा वापरणे हे समाजात चुकीचा संदेश पसरवणारे आहे. तसेच डिजिटल माध्यमांवर हा व्हिडिओ उपलब्ध असल्याने आयटी ॲक्ट आणि भारतीय न्याय संहितेच्या नियमांचे उल्लंघन होते. या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र सायबर सेलने प्राथमिक तपास सुरू केला आणि प्रकरणाचे गांभीर्य पाहून हनी सिंगला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश जारी केले.

हेही वाचा : Elon Musk Starlink India : एलोन मस्क भारताला हायजॅक करणार? अंबानींशी वादामागचं नेमकं कारण काय?

महाराष्ट्र सायबर सेलने चौकशीसाठी का बोलावले? ( Yo Yo Honey Singh Cyber Cell )

कायदेशीर प्रक्रिया सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र सायबर सेलने हनी सिंगला एकामागून एक तीन वेळा समन्स बजावले. मात्र, प्रत्येक वेळी हनी सिंगने चौकशीला येणे टाळले. त्याने आपल्या वकिलामार्फत पोलिसांना कळवले की, तो त्याच्या पूर्व नियोजित आंतरराष्ट्रीय दौऱ्यांमुळे आणि म्युझिक प्रोजेक्ट्समुळे परदेशात व्यस्त आहे, त्यामुळे तो हजर राहू शकत नाही.शेवटी, सायबर सेलने कडक भूमिका घेत त्याला अंतिम नोटीस बजावली. यावर हनी सिंगच्या कायदेशीर टीमने चौकशीसाठी २२ ऑक्टोबर २०२६ पर्यंतची मुदत वाढवून मागितली होती. परंतु, सायबर सेलने त्याची ही विनंती थेट फेटाळून लावली आणि त्याला तातडीने हजर राहण्याचे आदेश दिले. पोलिसांचा कडक पवित्रा पाहिल्यानंतर अखेर हनी सिंगला नमते घ्यावे लागले आणि तो १६ ऑक्टोबर रोजी मुंबईत दाखल झाला. हनी सिंग आपल्या वकिलांच्या ताफ्यासह मुंबईतील सायबर सेल कार्यालयात पोहोचला. तेथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याची दोन तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी करण्यात आली.

या चौकशी दरम्यान त्याला दिल्ली कॉन्सर्टमधील व्हायरल व्हिडिओमधील आवाज त्याचाच आहे का? सार्वजनिक मंचावरून अशा प्रकारची भाषा वापरण्यामागचा त्याचा उद्देश काय होता? इंटरनेटवर हा व्हिडिओ पसरवण्यामध्ये किंवा तो व्हायरल होण्यामध्ये त्याचा काही सहभाग होता का? असे आणि अजूनही अधिक प्रधन विचारल्याची माहितीये, माहितीनुसार, हनी सिंगने पोलिसांसमोर आपले विधान रेकॉर्ड केले. यापूर्वी वाद वाढल्यानंतर त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी करून सार्वजनिक माफी देखील मागितली होती. त्याने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले होते की, मी कॉन्सर्टमध्ये उपस्थित असलेल्या आजच्या पिढीशीतरुणांशी त्यांच्याच भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न करत होतो. माझा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा महिलांचा अपमान करण्याचा नव्हता. पण हो, माझी बोलण्याची पद्धत आणि शब्द चुकीचे होते आणि त्याबद्दल मी दिलगीर आहे. पोलिसांनी त्याचे हे सर्व युक्तिवाद आणि जबाब लेखी स्वरूपात नोंदवून घेतले आहेत.

चौकशीत काय घडलं आणि पुढे काय होणार?

सध्या सायबर पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. जर सायबर पोलिसांना या तपासात हनी सिंग ( Honey Singh ) दोषी आढळला, किंवा त्याच्या विधानांमुळे कायद्याचे गंभीर उल्लंघन झाले आहे असे निष्पन्न झाले, तर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन पुढील कायदेशीर कारवाई किंवा न्यायालयीन खटल्याला त्याला सामोरे जावे लागू शकते. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा एक मोठा सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे की, कलाकारांना असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मर्यादा काय असावी? विशेषतः जेव्हा कोट्यवधी तरुण तुम्हाला फॉलो करत असतात, तेव्हा सार्वजनिक व्यासपीठावर बोलताना जबाबदारीचे भान राखणे किती गरजेचे आहे, हेच या प्रकरणावरून स्पष्ट होते.

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics, UI & UX.Education : Bachelor Of Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. Awarded By : 🥇The Best Digital Marketer And Technologist Award🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts