Pune University Exam Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २३ ऑक्टोबर २०२६ रोजी नियोजित सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, परीक्षांच्या नव्या तारखा स्वतंत्र परिपत्रकाद्वारे जाहीर केल्या जाणार आहेत.
Pune University Exam Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे २३ ऑक्टोबर २०२६ रोजी (Pune University Exam 2026 ) होणाऱ्या विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात (SPPU Exams Postponed ) आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता नव्या वेळापत्रकाची ( Exam Time Table) प्रतीक्षा करावी लागणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचा निर्णय
राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या (Election Impact on Exams ) निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची तसेच परीक्षा व्यवस्थापनाशी संबंधित यंत्रणेची गैरसोय टाळण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्या दिवशी नियोजित असलेल्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. डॉ. राजेंद्र तलवारे यांनी यासंदर्भात माहिती दिली.
परीक्षांच्या नव्या तारखा कधी जाहीर होणार?
२३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाकडून स्वतंत्र परिपत्रकाद्वारे जाहीर केले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नव्या तारखांबाबत विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन चेक करावे.
महाविद्यालयांनाही सूचना
परीक्षांच्या वेळापत्रकातील बदलाची नोंद घेऊन सर्व संलग्न महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना त्वरित माहिती द्यावी, अशा सूचना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी काय करावे?
२३ ऑक्टोबरच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर होईपर्यंत विद्यापीठाच्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवा.
आपल्या महाविद्यालयाशी संपर्क साधून परीक्षेच्या बदललेल्या तारखांची माहिती घ्या.
इतर दिवशी नियोजित असलेल्या परीक्षांबाबत स्वतंत्र सूचना नसल्यास स्वतःहून कोणताही बदल गृहीत धरू नका.
परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील नियोजन करता येणार आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या अधिकृत परिपत्रकाची प्रतीक्षा करणे महत्त्वाचे ठरणार आहे.





