• Home
  • Top News
  • पुणे विद्यापीठात अमोल कोल्हे यांचे व्याख्यान, विद्यार्थी संघटनांचा तीव्र विरोध, वादाची ठिणगी पडली
Pune

पुणे विद्यापीठात अमोल कोल्हे यांचे व्याख्यान, विद्यार्थी संघटनांचा तीव्र विरोध, वादाची ठिणगी पडली

Amol Kolhe lecture at Pune University

Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) आज शुक्रवार २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानाचे (Lecture by Amol Kolhe) आयोजन करण्यात आले आहे. मात्र, काही विद्यार्थी संघटनांनी यावर तीव्र अक्षेप (Objection from student organizations) घेतला आहे. त्यासंबंधी विद्यार्थ्यांनी आपल्या सह्यांचे पत्र विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिले आहे. या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप येईल, असा त्यांचा आक्षेप आहे. दुसरीकडे कोल्हे यांच्या समर्थनार्थ काही विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना पत्र (Students’ letter of support to the Vice Chancellor) लिहिले आहे. शिवजयंतीनिमित्त होणाऱ्या अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानाला विरोध झाल्यामुळे पुण्यात वादाची ठिणगी पडली आहे.

हेही वाचा – चार वर्षीय चिमुकला अंगणवाडीत कोंडला, नशिब बेहत्तर म्हणून जीव वाचला

पुणे विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर इरावती कर्वे सभागृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार “अमोल कोल्हे यांचे भाषण आयोजित केले आहे. या संबंधी शिवजन्मोत्सव विद्यार्थी उत्सव समिती यांना कुठलीही कल्पना न देता केवळ काही लोकांच्या आग्रहामुळे राजकीय पार्श्वभूमी असलेला वक्ता निमंत्रित करून कार्यक्रम आयोजित करणे हे व्यवहार्य नाही. त्यामुळे या कार्यक्रमास संपूर्ण राजकीय स्वरूप येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अशा प्रकारच्या राजकीय कार्यक्रमास समर्थन करते का? याचे उत्तर प्रशासनाने देणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर या वक्त्याचा कार्यक्रम रद्द करावा असा इशारा सकल विद्यार्थी समूहाच्या वतीने देण्यात आला आहे.

जयंतीनिमीत्त अभ्यासू व गुणवंत वक्त्यांना आमंत्रित

सावित्तीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विविध महापुरुषांच्या जयंतीनिमीत्त अभ्यासू व गुणवंत वक्त्यांना आमंत्रित केले जाते. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये त्या महापुरुषांचे विचार पोहोचवणे, त्यांचे कार्य समजावुन सांगणे आणि प्रेरणा देने हे महत्वाचे कार्य घडत असते. छत्तपती शिवाजी महाराजांच्या जयंनिनिमित्त आपण डॉ. अमोल कोल्हे यांना विद्यापीठात आमंत्रित केले आहे, हि स्वागतार्ह बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा व विचारांचा त्यांचा सखोल अभ्यास असुन त्यांच्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रेरणा मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. आपुढेही अशाच प्रकारे अभ्यासू व प्रेरणादायी वक्त्यांना आमंत्रित करुन महापुरु‌षांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य विद्यापीठाने सातत्याने करावे, अशा समर्थनार्थ काही विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना पत्र लिहिले आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानामुळे विद्यापीठात वादाची ठिणगी पडली आहे.

विद्यार्थी संघटनांनी माझ्या व्याख्यानाला विरोध

“काही विद्यार्थी संघटनांनी माझ्या व्याख्यानाला विरोध केलाय. मात्र, पुणे विद्यापीठाकडून मला अधिकृत कोणतीही माहिती नाही. त्यामुळे आज चार वाजता होणाऱ्या व्याख्यानाला मी जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती देणे हे माझं कर्तव्य आहे. राजकीय जोडे बाजूला ठेऊन मी अशा व्याख्यानाला जात असतो,” अशी प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे यांनी दिलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts