• Home
  • ताज्या बातम्या
  • Marco Rubio India Visit : रुबियो यांच्या भारत दौऱ्याकडे जगाचे लक्ष! व्यापार करारापासून रशियन तेलापर्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांची चर्चा?
देश

Marco Rubio India Visit : रुबियो यांच्या भारत दौऱ्याकडे जगाचे लक्ष! व्यापार करारापासून रशियन तेलापर्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांची चर्चा?

Marco Rubio India Visit
25
Marco Rubio India Visit: भारत आणि अमेरिकेतील व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्याबाबत चर्चा पुढे सरकत असताना, दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. अमेरिकी शुल्कांबाबतच्या निर्णयांमुळे भारतीय निर्यातदारांना दिलासा मिळण्याची शक्यता असली, तरी करारातील अटी आणि अंतिम निर्णय महत्त्वाचे ठरणार आहेत

भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांच्या दृष्टीने अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो ( Marco Rubio) यांच्या भारत दौऱ्याची सर्वत्र चर्चा होत आहे. २० ते २२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीतील नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर व्यापार करार, ऊर्जा सुरक्षा, संरक्षण सहकार्य आणि गुंतवणूक या मुद्द्यांकडे लक्ष लागले आहे.

व्यापार कराराचा तिढा सुटणार?

भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित व्यापार करार हा चर्चेतील महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. दोन्ही देशांमधील व्यापार वाढवणे, बाजारपेठांमध्ये प्रवेश सुलभ करणे आणि गुंतवणुकीला चालना देणे यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या कराराबाबत प्रगती झाल्यास उद्योग, निर्यातदार आणि गुंतवणूकदारांसाठी त्याचे महत्त्व वाढू शकते. भारताची ऊर्जा सुरक्षा आणि रशियाकडून होणारी तेल आयात हा भारत-अमेरिका संबंधांमधील (India US Trade Deal) संवेदनशील विषय आहे.

ऊर्जा पुरवठ्याचे पर्याय, आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल आणि द्विपक्षीय ऊर्जा व्यापार यावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि, रशियन तेलाचा (Russian Oil)  मुद्दावरच्या प्रश्नांवरच्या चर्चेकडे सर्वांचे लक्ष आहे. व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रांसोबत संरक्षण, गुंतवणूक आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील सहकार्यालाही या संभाव्य दौऱ्यात महत्त्व मिळू शकते. भारत-अमेरिका भागीदारी (India Foreign Policy) अधिक व्यापक करण्यासाठी उच्चस्तरीय संवाद महत्त्वाचा मानला जातो. मात्र, कोणत्या विषयांवर प्रत्यक्ष चर्चा होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानं रद्द केले 85 हजार व्हिसा! अनेक विद्यार्थ्यांना बसणार फटका, कारवाईचं कारण काय?

जामनगर रिफायनरी भेटीबाबत उत्सुकता (Jamnagar Refinery)

मार्को रुबियो गुजरातमधील जामनगर येथे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Relance Industry) तेल शुद्धीकरण प्रकल्पाला भेट देणार असल्याचे वृत्त आहे. ही भेट निश्चित झाल्यास भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील औद्योगिक क्षमतेकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले जाऊ शकते. मुंबईतील ताज स्मारक येथे २६/११ दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रमही प्रस्तावित असल्याचे वृत्त आहे. दहशतवादाविरोधातील भारत-अमेरिका सहकार्याच्या दृष्टीने अशा कार्यक्रमाला प्रतीकात्मक महत्त्व असू शकते. या कार्यक्रमाची वेळ आणि स्वरूप नेमके काय आहे हे पाहावे लागेल.

पुढील घडामोडींकडे लक्ष

व्यापार करार, ऊर्जा सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य यांसारखे मुद्दे भारत-अमेरिका (India – US) संबंधांची पुढील दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे रुबियो यांच्या दौऱ्याबाबतच्या अधिकृत घोषणांकडे आणि संभाव्य चर्चेच्या निष्कर्षांकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :  Donald Tusk India Visit : पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क उद्यापासून भारत दौऱ्यावर; संरक्षण, व्यापार आणि तंत्रज्ञान सहकार्यावर भर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts