Lawrence Bishnoi Gang: बिश्नोई गँग सध्या बॉलिवूडमध्ये दहशत माजवताना दिसत आहे…मात्र महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार बिश्नोई गँगला रोखण्यात अपयशी होताना दिसत आहे….यावरूनच आता खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना धारेवर धरलंय…लॉरेन्स बिश्नोई अस्तित्त्वात नाही, अमित शाहचं लॉरेन्स बिश्नोई…या देशाचा गृहमंत्री, ज्याच्यावर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आहे…तो एक माफिया आहे…लॉरेन्स बिश्नोईच फक्त नाव आहे…पण या देशातील गुंडाची टोळी कुणी चालवत असेल तर गुजरातचा हा अमित शहा… हाच लॉरेन्स बिश्नोई आहे, अशी टीका खासदार संजय राऊतांनी केलीये…पण राऊतांनी अमित शाहांन लॉरेन्स बिश्नोई का म्हटलं आहे…लॉरेन्स बिश्नोईला केंद्र सरकार गुजरातच्या जेलमधून का हलवत नाही?
लॉरेन्स बिश्नोई की अमित शाह? (Lawrence Bishnoi Gang)
बिश्नोई गँगने टायगर श्रॉफवर हल्ला केलाय…तीन जणांनी गोळीबार केल्यानंतर या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली…यापूर्वी बिश्नोई गँगने रोहित शेट्टी, सलमान खानसह काही सेलिब्रिटींवर हल्ला करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे…एवढ्या सेलिब्रिटींवर हल्ला झाल्यानंतर ना महाराष्ट्र सरकारने बिश्नोई गँगवर कठोर कारवाई केली आहे ना केंद्र सरकारने…लॉरेन्स बिश्नोई गुजरातमधील साबरमती जेलमध्ये बंद आहे…लॉरेन्सला त्या ठिकाणी जेलमध्ये मोबाईल पुरवले जात असल्याची चर्चा आहे..तसंच केंद्र सरकारने असा कायदा केला आहे, ज्यामुळे देशातील कोणतंही सरकार किंवा पोलीस लॉरेन्सला चौकशीसाठी आपल्या राज्यात आणू शकत नाही….त्याला साबरमती जेलमधून कुणीच हलवू शकत नाही…त्याला गेल्या काही महिन्यांपासून कुणीच पाहिलं नाही…आता टायगरवर झालेल्या हल्ल्यावरून संजय राऊतांनी लॉरेन्स बिश्नोई अस्तित्त्वात नाही, अमित शाहचं लॉरेन्स बिश्नोई आहे, असा मोठा दावा केला आहे…
लॉरेन्स बिश्नोई जेलमध्ये बसून आज मोठं मोठ्या लोकांना टार्गेट करताना दिसत आहे…त्याचं साम्राज्य रोखण्यात केंद्र सरकार अपयशी दिसत आहे…मात्र केंद्र सरकार देशातील तरूणांना शोधण्यात पहिल्यानंबरवर पाहिला मिळत आहे…अमित शाहांचे दिल्ली पोलीस आंदोलन करण्याच्या पहिलेच, तरूणांकडून गुन्हा घडण्याच्या पहिलेच त्यांना ताब्यात घेऊन अज्ञात स्थळी 24 -24 तास ठेवतात…तरूणाना बेदम मारहाण करताना दिसतात…मात्र केंद्र सरकार त्यांचीच सत्ता असलेल्या गुजरातमध्ये बंद असलेल्या बिश्नोईला रोखण्यात यशस्वी होताना दिसत नाही…बिश्नोई गँगच्या दहशतीवरून राऊतांनी थेट अमित शाहांना जबाबदार धरलंय…या देशाचा गृहमंत्री, ज्याच्यावर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आहे…तो एक माफिया आहे…लॉरेन्स बिश्नोईच फक्त नाव आहे…पण या देशातील गुंडाची टोळी कुणी चालवत असेल तर गुजरातचा हा अमित शहा… हाच लॉरेन्स बिश्नोई आहे…म्हणून आम्हाला ही सत्ता बदलायची आहे…सत्ता बदल करायची असं म्हटलं की त्यांना खूपच त्रास होतो…अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली…
हेही वाचा : ठाकरे VS शिंदे: दसरा मेळाव्यात शेतकरी मदतीवरून आरोप-प्रत्यारोप! दसरा मेळाव्या मध्ये नेमकं काय घडलं?
धनुष्यबाण चिन्हाबाबत संजय राऊतांचा दावा (Sanjay Raut)
शस्त्र देवांच्या हातात आहे…पण मुंबईत हे गुंडांच्या हातात गेलंय…त्या गुंडाचे सरदार अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस आहे…मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा रोज मुडदा पडतो…त्याच्यामुळे जर लोकांना सुरक्षा हवी असेल तर..शिवसेना हेच एकमेवर शस्त्र आहे…जो शिवसेनेचं नाव घेईल त्याचं संरक्षण होईल…आज या शस्त्र पूजेमध्ये धनुष्यबाण नसेल…पुढच्या दसऱ्याला इथं आपला धनुष्यबाण असेल…असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय…
एकेकाळी मुंबईतील बॉलिवूडवर दाऊद इब्राहिमसह विविध अंडरवर्ल्ड टोळ्यांची दहशत होती. १९९०च्या दशकात चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांना खंडणीच्या धमक्या मिळत होत्या, तर काहींवर प्राणघातक हल्लेही झाले. याच काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा चित्रपटसृष्टीत मोठा राजकीय प्रभाव होता…शिवसेना लोकांच्या सरंक्षणासाठी धावून गेली होती…आताही 1990 सारखी परिस्थिती बॉलिवूडमध्ये पाहायला मिळत आहे…त्या काळी दाऊद होता…आता लॉरेन्स बिश्नोई गँग आहे..जी बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रय़त्न करत आहे…यावरून राऊतांनी दावा केलाय की शिवेसनाच फक्त लोकांचं रक्षण करू शकते…
राऊतांनी धनुष्यबाण चिन्हाबाबतही मोठं वक्तव्य केलं आहे…आज धनुष्यबाण चिन्ह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे…हेच धनुष्यबाण चिन्ह पुढच्या दसरा मेळाव्याला आपल्याकडे पाहायला मिळेल असा दावा राऊतांनी केलाय…त्यामुळे खरंच धनुष्यबाण ठाकरेंकडे येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…









