• Home
  • ताज्या बातम्या
  • सलमान खानने बिश्नोई गँगची माफी मागावी? सदावर्तेंनी गँगवर काय म्हटलं?
गुन्हा

सलमान खानने बिश्नोई गँगची माफी मागावी? सदावर्तेंनी गँगवर काय म्हटलं?

Lawrence Bishnoi Gang
3

Lawrence Bishnoi Gang : बिश्नोई गँग सलमान खानला टार्गेट करताना दिसत आहे….सलमान खानने बिश्नोई समाजाची माफी मागावी, अशी मागणी बिश्नोई गँगची आहे…आता बिश्नोई गँगने टायगर श्रॉफवर हल्ला केलाय…कारण काय तर टायगर सलमान सोबत काम करत आहे…यावर प्रतिक्रिया देताना वकील गुणरत्न सदावर्तेंनी म्हटलंय की सलमान खानने बिश्नोई समाजाची माफी मागावी…सलमान खानला बिश्नोई समाजाची माफी मागायला काय होत आहे…एखाद्या समाजाची माफी मागण्यात काय कमी पणा आहे…म्हणजे एका प्रकारे सदावर्तेंनी बिश्नोई गँगची पाठराखण केली की काय? असा प्रश्न निर्माण झालाय…बिश्नोई गँग चुकीचं करत आहे…बिश्नोई गँगवर कारवाई व्हावी, अशी मागणी सदावर्ते करताना दिसले नाही..

त्यांनी बोलताना म्हटलं की सलमान खानने (Salman Khan) बिश्नोई समाजाची माफी मागून विषय संपवावा…जर बिश्नोई समाजाची माफी मागितल्यानंतर हे प्रकरण थांबणार असेल तर सलमान खानने माफी मागून हे प्रकरण शांत करावं…मात्र जर बिश्नोई गँग सलमान खानवरून बॉलिवूडला वेठीस धरत असेल तर सदावर्तेंनी त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली पाहिजे… सदावर्ते आंदोलन रोखण्यासठी जसं हाय कोर्टात धाव घेतात, आता तशीच धाव बिश्नोई गँगविरोधात घेतली पाहिजे…त्यांची पाठराखण करण्याचे काम करून नये, अशी टीका त्यांच्यावर होताना दिसत आहे…

सलमान खानने माफी मागावी? (Lawrence Bishnoi Gang)

बॉलीवूड अभिनेता सलमान खानवर १९९८ मध्ये ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोन दुर्मिळ काळवीटांची बेकायदेशीर शिकार केल्याचा आरोप असून, वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत बिश्नोई समाजाने त्याच्याविरोधात तीव्र न्यायालयीन लढा दिला होता …. या हाय-प्रोफाइल खटल्यात जोधपूर न्यायालयाने २०१८ मध्ये सलमान खानला दोषी ठरवून पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती, तर इतर सह-कलाकारांची निर्दोष मुक्तता केली होती. या शिक्षेविरोधात अभिनेत्याने उच्च न्यायालयात धाव घेतल्यामुळे सध्या तो जामिनावर बाहेर असून हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे… दरम्यान, याच जुन्या शिकारीचा सूड घेण्यासाठी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे…लॉरेन्स बिश्नोई आपली दहशत निर्माण करण्यासाठी सलमान खानसह इतर सेलिब्रिटींना टार्गेट करताना दिसत आहे…आता त्याने टायगर श्रॉफवर (Tiger Shroff) हल्ला केलाय…

यावरून सध्या आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे…खासदार संजय राऊतांनी काल अमित शाहांवर टीका करत लॉरेन्स बिश्नोई अस्तित्वात नाही, अमित शाहचं लॉरेन्स बिश्नोई आहे, असं म्हटलं होतं..मुंबई पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहे..मात्र आज पत्रकार परिषदेत बोलताना गुणरत्न सदावर्तेंनी सलमान खानने बिश्नोई समाजाची माफी मागावी, असा सल्ला दिला आहे…सदावर्तेंनी जरी चांगला सल्ला दिला असला तरी त्यांच्या तोंडातून एकदाही बिश्नोई गँग हा शब्द निघाला नाही…त्यांनी तर अनावधानाने बिश्नोई साहब म्हटलं आणि नंतर शब्द बरोबर करत बिश्नोई समाज असं म्हटलं..त्यामुळे सदावर्तेंना नेमकी कुणाची बाजू मांडायची आहे, असा प्रश्न आता निर्माण झालाय…

हेही वाचा : बिश्नोई अस्तित्त्वात नाही अमित शहाच लॉरेन्स बिश्नोई आहेत? संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

बिश्नोई गँगविरोधात कठोर कारवाईची मागणी होणार का? (Salman Khan Lawrence Bishnoi)

बिश्नोई गँग गेल्या काही महिन्यांपासून देशभरात दहशत माजवताना दिसत आहे…काळवीटाच्या शिकारीचा फक्त बहाणा आहे…देशात दहशत पसरवणं हेच बिश्नोई गँगचा मुख्य उद्देश असल्याची चर्चा आहे…बिश्नोई गँगने आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींवर हल्ला केला आहे…तसचं त्यांनी माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या देखील केली आहे…काही उद्योगपतींवर देखील बिश्नोई गँगने हल्ला घडवून आणला आहे…असं असताना बिश्नोई गँगवर कोणतीही कठोर कारवाई होताना दिसत नाही…बिश्नोई गँगची अद्याप दहशत कमी करण्यात राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला यश आलेलं नाही…राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्राचे गृहमंत्री अमित शाह यांना जणू लॉरेन्स बिश्नोई आव्हान देत आहे की माझं तुम्ही काहीच करू शकत नाही..मी तुमच्या डोळ्यासमोर मोठं मोठ्या लोकांची हत्या घडवून आणू शकतो…देशातील सामान्य जनतेचा जीव तर मूंग्यापेक्षा स्वस्त आहे…कारण बिश्नोई गँग जर VIP लोकांवर हल्ला करू शकते, तर त्याच्यासाठी सामान्य माणसाची हत्या करणं कोणतीही मोठी गोष्ट नाही….

सर्व गोष्टींवर पत्रकार परिषद घेत गाजावाजा करणारे, कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे गुणरत्न सदावर्ते बिश्नोई गँगविरोधात कधी कारवाईची मागणी करणार?…इतर विषयावर, आंदोलनावर सदावर्ते मुंबई हाय कोर्टात धाव घेताना दिसतात…मग आता सदावर्ते लॉरेन्स बिश्नोई विरोधात कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी…त्याची दहशत, भीती राज्यातून देशातून कमी करण्यासाठी हाय कोर्टात आणि सुप्रीम कोर्टात का जाताना दिसत नाही? असा प्रश्न आता निर्माण झालाय…सदावर्ते बिश्नोई गँगविरोधात कोर्टात जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts