• Home
  • ताज्या बातम्या
  • राज ठाकरेंचा मोठा दावा! देशात पंतप्रधान राहणार नाही? मोदी सरकार कोसळणार?
राजकारण

राज ठाकरेंचा मोठा दावा! देशात पंतप्रधान राहणार नाही? मोदी सरकार कोसळणार?

Raj Thackeray
16

Raj Thackeray : देशात सध्या सत्ता बदलचे वारे वाहताना पाहायला मिळत आहे…देशभरात आणि जगभरात सर्वांत पॉप्युलर म्हणून ओळखले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरूणांचं आंदोलन रोखण्यासाठी थेट राजधानीत जवानांना उतरवलं…यामुळे आता पीएम मोदींची लोकप्रियता कमी झाल्याची चर्चा आहे…तरूणांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने आणि मुलींनाही बेदम मारहाण केल्याने विदेशातही भारताची बदनामी झाली…खासदारांची देखील दिल्ली पोलिसांनी धरपकड करत त्यांना फरफटलं…यामुळे आता देशात रिजीम चेंज म्हणजेच सत्ता बदल हा शब्द चांगलाच चर्चेत आला आहे…..

यातच राज ठाकरेंनी (Raj Thackeray) देखील मोठा दावा केलाय…पुढील काही महिन्यात संपूर्ण देश रसत्यावर उतरणार ….एक काळ येईल देशात पंतप्रधान राहणार नाही….4-5 महिन्यात देशात काहीतरी मोठी गडबड होईल हे निश्चित आहे, असं राज ठाकरेंनी म्हटल्याने एकच खळबळ उडाली आहे…देशात खऱंच सत्ता बदल होणार की काय? देशात नेपाळ-बांग्लादेश सारखी परिस्थिती तर निर्माण होणार नाही ना? असा प्रश्न निर्माण झालाय….

राज ठाकरेंचा मोठा दावा! देशात पंतप्रधान राहणार नाही? (Raj Thackeray)

पंतप्रधान मोदींनी गेल्या काही वर्षांमध्ये आपण सर्वसामान्यांचे पंतप्रधान आहे, गरीबांचे पंतप्रधान आहे, अशी एक प्रतिमा तयार केली होती…त्यांना मानणारा देशभरात मोठा तरूण वर्गही होता…त्यांची लोकप्रियता एवढी वाढली होती की जगातील सर्वात पॉप्युलर नेत्यांपैकी एक ते बनले होते…मागील 12 वर्षात त्यांनी कलम 370 हटवणे….तीन तलाक रद्द, असे काही निर्णय घेतले आणि घराघरात मोदींची लोकप्रियता पोहोचली…पण गेल्या 11 ते 12 वर्षांत पीएम मोदींनी जी प्रतिमा तयार केली होती, ती जंतरमंतरवर तरूणांवर लाठीचार्ज केल्यानंतर मलिन झाली आहे…संसदेत पीएम मोदी असताना त्यांनी तरूणांशी चर्चा करण्याऐवजी संसदेतून ते निघून गेले…यानंतर दिल्ली पोलिसांनी तरूणांवर अश्रू धुरांचा, पाण्याचा मारा केला…पोलिसांनी तरूणांना-तरूणींना बेदम मारहाण केली…काही गुंडांनी देखील तरूणींना मारहाण केली…दिल्ली पोलीस त्रास देत असताना तरूण-तरूणींनी पावसात जंतरमंतरवर जमिनीवर झोपून आपला लढा सुरू ठेवला आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला…

मोदी सरकारने चर्चेतून आंदोलनावर तोडगा काढण्याऐवजी तरूणांना चिरडण्याचा निर्णय घेतला…या आंदोलनात काही जणांना एवढं मारण्यात आलं की त्यांची थेट डोकी फुटली…त्यांना दवाखान्यात अनेक दिवस राहावं लागलं…तरूणांच्या मनात हे दृश्य, प्रसंग अजून ताजेच होते, यातच दिल्ली पोलिसांनी पुन्हा तरूणांना बेदम मारहाण केली आहे…ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत सीजेपीने आणि विद्यार्थ्यांनी दिल्लीत आंदोलन करण्याचं ठरवलं…पण यावेळी देखील मोदी सरकारने चर्चेचा मार्ग काढण्याऐवजी थेट दिल्लीला छावणीचे स्वरूप दिले…रेल्वे, मेट्रो, इंटरनेट बंद केले…दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना बेदम मारहाण केली…याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत…दिल्ली पोलिसांनी इंडिया आघाडीच्या खासदारांची देखील धरपकड करत त्यांना फरफटलं…यानंतर देशात रिजिम चेंजबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे…यावर आता राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे…पुढील काही महिन्यात संपूर्ण देश रसत्यावर उतरणार आहे, 4-5 महिन्यात देशात काहीतरी मोठी गडबड होईल हे निश्चित आहे, असा दावा राज ठाकरेंनी केलाय…

हेही वाचा : ‘देशात मोठी गडबड होईल’; राज ठाकरेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

विरोधकांच्या एकजुटीमुळे सत्तेची समीकरणे बदलू शकतात का? (Modi Government)

पुढे बोलताना राज ठाकरेंना दावा केलाय की देशात पंतप्रधान राहणार नाही…पण राज ठाकरेंनी असा दावा का केलाय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल…तर सध्या सत्ता बदलचा वारा वाहत आहे…जर NDA तील काही पक्ष फुटून इंडिया आघाडीत गेले तर मोदी सरकार अल्पमतात येईल…लोकसभेत बहूमत नसल्याने मोदी सरकार कोसळेल…यानंतर इंडिया आघाडीत जागावाटपावरून खातेवाटपावरून वाद पाहायला मिळू शकतो…कारण इंडिया आघाडीत अनेक पक्ष आहेत…सर्वच पक्ष महत्त्वाच्या खात्यांवर दावा करतील…यामुळे लवकर सत्ता स्थापना होणार नाही आणि देशात पंतप्रधान राहणार नाही, असं म्हटलं जात आहे….

राज ठाकरेंनी केलेल्या दाव्यामुळे आता सत्ता बदलच्या चर्चेला हवा मिळाली आहे….कारण राज ठाकरे लवकर कोणत्याही विषयावर भाष्य करत नाही…पण त्यांनी दावा केलाय की पुढील काही महिन्यात संपूर्ण देश रस्त्यावर उतरणार आहे….4-5 महिन्यात देशात काहीतरी मोठी गडबड होईल हे निश्चित आहे…एक काळ येईल देशात पंतप्रधान राहणार नाही….या दाव्यामुळे आता खरंच मोदी सरकार कोसळणार का? देशात सत्ता बदल होणार का? देशाचे नवे पंतप्रधान कोण होईल? असे काही प्रश्न निर्माण झाले आहेत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts