Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • Kota – Udaipur Accident : कोटा हायवेवर भीषण अपघात! खाटू श्यामच्या दर्शनाहून परतताना एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू
गुन्हा

Kota – Udaipur Accident : कोटा हायवेवर भीषण अपघात! खाटू श्यामच्या दर्शनाहून परतताना एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू

Kota Highway accident in Rajasthan kills nine family members returning from Khatu Shyam temple
23
Kota – Udaipur Accident : राजस्थानमधील कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री भीषण दुर्घटना; खाटू श्यामजींच्या दर्शनाहून परतणाऱ्या १६ प्रवाशांना घेऊन जाणारी क्रूझर उभ्या ट्रकला धडकली, महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू, अपघातात लहान मुलांचाही समावेश.

राजस्थानमधील कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण रस्ते अपघाताची घटना घडली आहे. खाटू श्यामजी मंदिराचे दर्शन घेऊन महाराष्ट्रात परतणाऱ्या भाविकांच्या क्रूझर गाडीचा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील संबंधित कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Rajasthan Road Accident)

नेमका अपघात कसा घडला?

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील नाता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंभूपुरा गावाजवळ मध्यरात्री हा अपघात झाला. महाराष्ट्रातील भाविक खाटू श्यामजी मंदिराचे दर्शन घेऊन आपल्या घरी परतत होते. यावेळी प्रवाशांनी भरलेली क्रूझर गाडी महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की वाहनाचे मोठे नुकसान झाले आणि प्रवासी गाडीत अडकले.

या वाहनातून एकूण १६ जण प्रवास करत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. हे सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात आले आहे. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला असून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर कोटा मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  (Maharashtra Family Accident)

चालकाला डुलकी लागल्याचा प्राथमिक अंदाज

प्राथमिक माहितीनुसार, वाहन चालवताना चालकाला डुलकी लागल्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप तपासातून स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. खाटू श्यामजींच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा परतीचा प्रवास अशा प्रकारे दुःखद ठरल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Dharashiv Crime : धाराशिवमध्ये प्रेमसंबंधातून पतीच्या हत्येचा आरोप; पत्नी आणि प्रियकराविरोधात गुन्हा दाखल

LS Marathi – महाराष्ट्रातील बातम्या, पर्यटन आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्यासोबत राहा.

img

Shivani

Content Writer

Shivani Nagarale | Digital Journalist | News Writer | Digital Content CreatorHello! I am Shivani Nagarale, a digital journalist with two years of experience in journalism and digital media. Since beginning my professional journey in 2023, I have gained experience in various aspects of media, including digital content creation, news writing, information research, and content development for digital platforms.Alongside journalism, I have developed an understanding of digital media and digital marketing, gaining insights into content performance, audience engagement, and effective ways of reaching readers across digital platforms.Currently, I am working as a Digital Journalist at Loksevay, under LS Marathi, where I contribute to digital news production, covering current affairs, diverse news topics, informative articles, and reader-focused content. My approach to journalism emphasizes thorough research, factual accuracy, objective reporting, and clear, engaging writing.I believe in continuously adapting to the evolving landscape of digital journalism, exploring emerging media trends, and strengthening my editorial skills. My professional goal is to create credible, informative, and engaging content that bridges the values of responsible journalism with the growing reach of digital media.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts