• Home
  • महाराष्ट्र
  • अंबाजोगाई – लातूर महामार्गावर भीषण अपघात: ३ ठार, ४ गंभीर जखमी
Top News

अंबाजोगाई – लातूर महामार्गावर भीषण अपघात: ३ ठार, ४ गंभीर जखमी

Severe road accident on Ambajogai–Latur highway in Maharashtra leaving three dead and four critically injured

Ambajogai Latur highway accident : अंबाजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर बीड आणि लातूर जिल्ह्याच्या सीमेवर सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. या अपघातात स्विफ्ट डिझायर आणि स्कार्पिओ या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. या दुर्घटनेत तीन जण जागीच ठार झाले असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

सा घडला अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 12 सी वाय 7020 क्रमांकाची स्विफ्ट डिझायर कारमधून चार जण सायगाव येथे सुरू असलेल्या उरुसासाठी जात होते. त्याचवेळी भरधाव वेगात असलेल्या कारचा ताबा सुटला. यामुळे कार थेट रस्त्याच्या दुभाजकावरून उसळून विरुद्ध दिशेने येणाऱ्या एम एच ४४ वाय ४७७१ क्रमांकाच्या स्कार्पिओ गाडीवर जोरात आदळली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले.

हे ही वाचा : बँकेच्या वसूली एजंटला पोत्यात बांधून जिवंत जाळलं, लातुरात थरारक हत्याकांड

पंचनामा सुरु

घडलेल्या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. गंभीर जखमींना तातडीने पुढील उपचारासाठी लातूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यानंतर जखमी आणि मृतांची ओळख पटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. उरुसाला जाणाऱ्या प्रवाशांवर काळाने घाला घातल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातातील मृतांची नावे आणि कोणत्या गावचे रहिवासी आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस घटनेचा पंचनामा करत असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts