Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Star Pravah Journey : मनोरंजनाची १८ वर्षे! ‘स्टार प्रवाह’चा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा प्रवास
मनोरंजन

Star Pravah Journey : मनोरंजनाची १८ वर्षे! ‘स्टार प्रवाह’चा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा प्रवास

Star Pravah Journey
2
Star Pravah Journey : महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी हे बिरुद अभिमानाने मिरवणाऱ्या स्टार प्रवाहने मराठी मनोरंजनविश्वात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. गेल्या १८ वर्षांत (18 year complete) अनेक लोकप्रिय मालिका, लक्षवेधी व्यक्तिरेखा आणि मनोरंजनाच्या माध्यमातून सामाजिक विषय मांडत वाहिनीने प्रेक्षकांशी आपुलकीचं नातं जपलं आहे.

काही प्रवास फक्त अंतर पार करत नाहीत, तर मनं जोडतात… काही प्रवास केवळ मनोरंजन करत नाहीत, तर प्रेक्षकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनतात. स्टार प्रवाहचा १८ वर्षांचा प्रवास हा असाच प्रेमाचा, विश्वासाचा आणि अभिमानाचा आहे. महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी हे बिरुद अभिमानाने मिरवणाऱ्या स्टार प्रवाहने गेल्या १८ वर्षांत मराठी मनोरंजनविश्वात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. (Marathi Entertainment) आपुलकीचं नातं कायम जपलं आहे.

लोकप्रिय मालिकांनी गाजवला प्रवास

या प्रवासात अनेक लोकप्रिय मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अनेक व्यक्तिरेखा घराघरांत पोहोचल्या. कधी हसवलं, कधी रडवलं, कधी नात्यांची नवी परिभाषा शिकवली, (Marathi Television) तर कधी सामाजिक विषयांना मनोरंजनाच्या माध्यमातून प्रभावीपणे हात घातला. प्रत्येक मालिकेने, प्रत्येक कथेने आणि प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. मराठी संस्कृती, परंपरा आणि आधुनिक विचार यांचा सुंदर संगम घडवत वाहिनीने आपल्या कार्यक्रमांमधून महाराष्ट्राच्या मातीतली नाळ कायम जपली.

हेही वाचा :   लावणीच्या ठेक्यावर थिरकणारी पावलं कायमची थांबली! ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचं वयाच्या ७३व्या वर्षी निधन

कलाकारांसह पडद्यामागील टीमचेही योगदान

या १८ वर्षांच्या यशस्वी वाटचालीमागे कलाकारांसोबतच लेखक, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ, पडद्यामागील संपूर्ण टीम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टार प्रवाहवर भरभरून प्रेम करणारे लाखो प्रेक्षक या प्रत्येकाचं योगदान मोलाचं आहे. (Marathi TV Channel) प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच स्टार प्रवाह वाहिनीचा यापुढील प्रवास अधिक रंजक आणि उत्कंठावर्धक असेल, यात शंका नाही. मनोरंजनाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या स्टार प्रवाहच्या या प्रवासाला प्रेक्षकांकडूनही शुभेच्छा दिल्या जात आहेत.

LS Marathi – महाराष्ट्रातील बातम्या, पर्यटन आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्यासोबत राहा.

img

Shivani

Content Writer

Shivani Nagarale | Digital Journalist | News Writer | Digital Content CreatorHello! I am Shivani Nagarale, a digital journalist with two years of experience in journalism and digital media. Since beginning my professional journey in 2023, I have gained experience in various aspects of media, including digital content creation, news writing, information research, and content development for digital platforms.Alongside journalism, I have developed an understanding of digital media and digital marketing, gaining insights into content performance, audience engagement, and effective ways of reaching readers across digital platforms.Currently, I am working as a Digital Journalist at Loksevay, under LS Marathi, where I contribute to digital news production, covering current affairs, diverse news topics, informative articles, and reader-focused content. My approach to journalism emphasizes thorough research, factual accuracy, objective reporting, and clear, engaging writing.I believe in continuously adapting to the evolving landscape of digital journalism, exploring emerging media trends, and strengthening my editorial skills. My professional goal is to create credible, informative, and engaging content that bridges the values of responsible journalism with the growing reach of digital media.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts