• Home
  • ताज्या बातम्या
  • Gold Price Today : सोनं-चांदी दोन्ही स्वस्त! 10 ग्रॅम सोन्याचा आणि 1 किलो चांदीचा भाव पाहा
बिजनेस

Gold Price Today : सोनं-चांदी दोन्ही स्वस्त! 10 ग्रॅम सोन्याचा आणि 1 किलो चांदीचा भाव पाहा

Gold Price Today
55
Gold Price Today: सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आजच्या बाजारातून दिलासादायक बातमी आहे. जळगावच्या सराफ बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात घसरण झाली असून, १० ग्रॅम सोनं आणि एक किलो चांदीचा आजचा भाव किती आहे, जाणून घेऊया.

Gold Price Today: सोनं खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी आजचा दिवस महत्वाचा ठरू शकतो. गेल्या काही दिवसांपासून मौल्यवान धातूंच्या बाजारात चढ- उतार सुरू असून, जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्यासह चांदीच्या दारातही (Jalgaon Gold Rate) घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे दागिने खरेदी करण्याची तयारी करणाऱ्या ग्राहकांचे लक्ष आजच्या दरांकडे लागले आहे.

भारतात सोन्याला केवळ गुंतवणुकीचे साधन म्हणून नव्हे, तर परंपरा आणि संस्कृतीचा एक महत्वाचा भाग म्हणूनही पाहिले जाते. लग्नसमारंभ, सण- उत्सव तसेच विविध शुभकार्यांमध्ये सोन्याच्या दागिन्यांना विशेष महत्त्व असते. त्यामुळे दर कमी झाल्यानंतर बाजारातील हालचालींकडे ग्राहकांचे लक्ष असते.

हेही वाचा: West Bengal Politics : पोटनिवडणुकीआधी तृणमूलला धक्का; अनेक नेते-कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

24 तासांत सोन्याचा भाव किती घसरला?

जळगावच्या सराफ बाजारात मागील २४ तासांच्या तुलनेत सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची घट झाल्याची माहिती आहे. सध्याच्या दरानुसार १० ग्रॅम सोन्याची किंमत जीएसटीसह १,५१,९२५ रुपये इतकी झाली आहे.

म्हणजेच अलीकडील वाढीनंतर सोन्याच्या दरात काही प्रमाणात दिलासा मिळताना दिसत आहे. मात्र, प्रत्यक्ष दागिन्यांची किंमत ठरवताना सोन्याच्या दरासोबतच घडणावळ, मेकिंग चार्ज आणि इतर लागू शुल्कही विचारात घेतले जातात.

चांदीच्या दरातही मोठी घसरण

सोन्याबरोबरच चांदीच्या बाजारातही आज नरमाई पाहायला मिळाली. जळगावच्या सराफ बाजारात एका किलो चांदीचा दर जीएसटीसह २,३१,७५० रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत चांदीच्या दरात तब्बल तीन हजार रुपयांची घट झाली आहे.

महिनाभरात सोनं-चांदी किती स्वस्त?

गेल्या महिन्याच्या तुलनेत सोन्याच्या दरात सुमारे ८, ५०० रुपयांची घसरण झाली आहे. त्याच काळात चांदीच्या दारातही तब्बल १६ हजार रुपयांची घट झाल्याचे बाजारातील आकडेवारीतून दिसते.

दरम्यान, सोने-चांदीचे भाव बाजारातील परिस्थितीनुसार सतत बदलत असतात. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी स्थानिक सराफ बाजारातील ताजा दर आणि दागिन्यांची अंतिम किंमत तपासणे आवश्यक आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts