Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • घराच्या सांदवाडीत लावली होती 15.19 लाखांची गांजाची झाडे कोरची तालुक्यातील गावातून जप्त
गुन्हा

घराच्या सांदवाडीत लावली होती 15.19 लाखांची गांजाची झाडे कोरची तालुक्यातील गावातून जप्त

Cannabis plants worth Rs 15.19 lakh seized from backyard in Korchi taluka village

Cannabis plants seized Korchi : गडचिरोली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कुरखेडा उपविभागाअंतर्गत येणा­ऱ्या कोरची पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील हितकसा या गावात एका व्यक्तीने आपल्या सांदवाडीत अवैधरित्या लावलेली गांजाची झाडे जप्त करण्यात आली. या गांजाची किंमत 15 लाख 19 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी कळविले.

काय आहे प्रकरण

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला या गांजाच्या शेतीबाबत गोपनिय माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पथकाने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात हितकसा येथील इसम पुनाराम अलिसाय मडावी (45 वर्ष) याच्या घरी धाड टाकली. घराच्या सांदवाडीची पंचासमक्ष झडती घेतली असता, सांदवाडीत अंमली पदार्थाची (गांजाची) लहान-मोठी 160 झाडे लागवड केलेली दिसून आली.

हे ही वाचा : इंदूरमध्ये सांडपाण्यामुळे मृत्यूंचा आकडा 20 वर; 16 जण अजूनही ICU मध्ये

0.375 किलो ग्रॅ कॅनबिस वनस्पती जप्त

पंचासमक्ष तपासणी केली असता, त्या गर्द हिरव्या रंगाची पाने, फुले, बोंडे असेलेली ओली झाडे व अर्धसुखा गांजा असलेले कॅनबिस वनस्पती (अंमली पदार्थ गांजा) 30.375 कि.ग्रॅ. जप्त करण्यात आली. प्रतिकिलो 50,000 रुपये प्रमाणे त्याची किंमत 15 लाख 18 हजार 750 आणि ईलेक्ट्रीक काटा (किंमत 1000 रु.) असा एकुण 15 लाख 19 हजार 750 रुपये किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.

गुन्हा दाखल

आरोपी मडावी याने विक्री करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या घराच्या सांदवाडीमध्ये सदर अंमली पदार्थ उगवला असल्याने त्याच्याविरूद्ध गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस) 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस 2 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. अधिक तपास कोरचीचे पो.उपनिरीक्षक मुकुंद देशमुख करीत आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सपोनि समाधान दौंड, पोअं/ रोहीत गोंगले, प्रशांत गरफडे, शिवप्रसाद करमे, चालक रामदास ऊईनवार यांनी पार पाडली.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts