Cow slaughter attempt foiled near Daund : दौंड जिल्ह्यातील सोनवडी गावामध्ये गोवंश कत्तलीचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच हा प्रयत्न हाणून पाडत कारवाई करण्यात आली. याठिकाणावरून 24 गोवंशाची सुटका करण्यात आली असून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका पत्र्याच्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणात गोवंश डांबून ठेवण्यात आले होते. हे डांबलेले गोवंश मध्यरात्री कत्तल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती अहिरेश्वर जगताप याना मिळालाय. त्यानंतर त्यांनी तात्काळ दौंड पोलीस प्रशासनाला माहिती देऊन कायदेशीर कारवाईची मागणी केली. त्यानंतर दौंड पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
हे ही वाचा : बोअरची मोटार काढताना विजेचा धक्का;दोन पितापुत्रांसह चार जणांचा जागीच मृत्यू
24 गोवंश डांबलेल्या अवस्थेत
या पत्राशेडमध्ये चारापाणी न देता 22 गायी व 2 बैल असे एकूण 24 गोवंश डांबून ठेवलेले निदर्शनास आले. यावेळी शेड मालक धीरज औरंगे याच्याकडे चौकशी केली असता, हसन उर्फ लड्डू हस्मी कुरेशी, आसिफ कासम कुरेशी, इंद्रीस कुरेशी व आदिल कुरेशी (सर्व रा. खाटीक गल्ली, दौंड) यांनी कत्तलीसाठी हा गोवंश आणून ठेवला असल्याचे समोर आले. याशिवाय मध्यरात्री नेण्याचा त्यांचा उद्देश असल्याची माहिती समोर आली.
चौघांवर गुन्हा दाखल
या संपूर्ण घटनेची माहिती घेतल्यानंतर दौंड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून सर्व गोवंश ताब्यात घेतले. आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार हसन उर्फ लड्डू हस्मी कुरेशी, आसिफ कासम कुरेशी, इंद्रीस कुरेशी व आदिल कुरेशी या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












