Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • कात्रज घाटात भीषण अपघात; ट्रक चालकाचा मृत्यू, ट्रकचा क्लीनर गंभीर जखमी
Pune

कात्रज घाटात भीषण अपघात; ट्रक चालकाचा मृत्यू, ट्रकचा क्लीनर गंभीर जखमी

Katraj Ghat accident

Katraj Ghat accident : शहर झोपेत असताना आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कात्रज घाट परिसरातील महामार्गावर भीषण अपघात घडला. कात्रज घाटाकडून नवले ब्रिजकडे येताना जांभुळवाडी दरी पुलाजवळ लोखंडी पाईप/सळ्या भरलेल्या ट्रकने समोरील बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला असून ट्रकचा क्लीनर गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.

हेही वाचा – संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले, “एकनाथ शिंदे पुन्हा कधीच मुख्यमंत्री होऊच शकत नाही”

धडकेची तीव्रता इतकी होती की ट्रकचा पुढील केबिन पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातात बसमधील चार ते पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमी झालेल्या ट्रक चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, ट्रकचा क्लीनर लोखंडी सळ्या व केबिनमध्ये अडकून पडल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण झाले. अग्निशमन दलाने कटरच्या सहाय्याने त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पथक दाखल झाले असून अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. पहाटेच्या वेळीही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts