Water Tub Clue Bloody Murder of 4 Children : हरियाणातील पानिपत येथील एका सायको किलरने चार निष्पाप चिमुकल्यांचा जीव घेतल्याचं समोर आल्याने संपूर्ण देश हादरून गेला. मागील तीन मुलांचा मृत्यू म्हणजे अपघात होता, असं लोकांना वाटत होतं, पण हा अपघात नसून पूर्व नियोजित खून असल्याचं समोर आल्याचे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या चार जणांना खून करणारी महिला आता पोलिसांच्या ताब्यात सापडली आहे. या हत्ये मागील कारण ऐकून पोलिसही थक्क झाले आहे. ती मुलं माझ्यापेक्षा जास्त दिसायला सुंदर होती, केवळ एवढ्या कारणामुळे या चार चिमुकल्या जीवांचा बळी गेला आहे. पाण्याच्या एका टबमधून पोलिसांना एक क्लू मिळाला अन् या सायको किलर महिलेचा रक्तरंजित खेळ जगासमोर आला.
पानिपतच्या ३२ वर्षीय पूनम नावाच्या महिलेने हा सर्व हत्याकांत घडवून आणला आहे. ती एक सायको किलर आहे. जेव्हा पोलिसांनी तिला अटक केली तेव्हा तिला तिच्या या क्रूर कृत्याबद्दल कोणताही पश्चात्ताप झाला नाही. पानिपत पोलिसांच्या सांगण्यानुसार, पूनमने चौकशीदरम्यान कबूल केले की तिला सुंदर मुलांचा, विशेषतः मुलींचा हेवा वाटायचा. धक्कादायक म्हणजे, तिने मारलेल्या चार मुलांपैकी तीन मुली होत्या आणि एक तर तिचा स्वतःचाच मुलगा होता. खरंतर त्या महिलेला फक्त मुलींचा द्वेष होता, पण तिने स्वतःच्या मुलालाही मारले. हे ऐकूनच विचित्र वाटतंय, कारण फक्त मुलींना लक्ष्य करत असतानाच तिने तिच्या पोटच्या मुलाचाही जीव घेतला? असा प्रश्न अनेकांना पडला. त्यामागचं कारण ऐकून अनेकांना धडकी भरली.
हेही वाचा – भाजप नेत्या चा काळा कारनामा! स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट, ९ मुलींना अटक
बाथरूमधला टब स्टोअररूममध्ये आला, अन् हत्याकांडाचं भिंग फुटलं..
नुकताच एका मुलीचा बळी घेतला त्या मुलीच्या घरात लग्नाचे विधि सुरू होते. शगुन देण्यासाठी आजीने विधीला बोलावलं, हाक मारली. पण बऱ्याच हाका मारूनही विधि आली नाही, मग आजीने तिचा शोध सुरू केला. संपूर्ण कुटुंब घाबरले आणि त्यांनी मुलीचा शोध सुरू केला. बराच शोध घेतल्यानंतर, विधीचा मृतदेह लग्नघराच्या पहिल्या मजल्यावर एका बंद स्टोअररूममध्ये आढळला. तिचे डोके पाण्याच्या टबमध्ये बुडवले होते आणि तिचे पाय जमिनीवर होते. एफएसएल टीम आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले. “हा टब बाथरूममध्ये होता, मग तो स्टोअररूममध्ये कसा आला?” असा प्रश्न कुटुंबातील एका सदस्याने उपस्थित केला, तेव्हाच पहिला क्लू मिळाला.
चार ही खूनचा पूनमकडून कबुली
त्यानंतर पोलिसांनी सर्वांची स्वतंत्रपणे चौकशी सुरू केली. तेव्हाही पूनमने न घाबरता, अगदी आत्मविश्वासाने खोटी उत्तरं दिली. आम्ही सगळयांची टेस्ट घेऊ, असं पोलिसांनी सांगितलं. पोलिसी खाक्या दाखवत कठोरपणे चौकशी केल्यावर पूनमचं बिंग उघडं पडलं आणि तिने चारही हत्यांची कबुली दिली. आता जियाच्या मृत्यूचे गूढ उलगडले आहे, तिचे वडील दीपक यांनी पानीपतच्या सेक्टर 29 येथील औद्योगिक पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
चौकशीदरम्यान पूनम म्हणाली, “आमचे लग्न झाल्यानंतर, जेव्हा माझा मुलगा शुभम जन्माला आला, तेव्हा घरी सगळे मला टोमणे मारायचे. ते म्हणायचे की कुटुंबातील इतर मुलं पूनमच्या मुलापेक्षा जास्त देखणी आहेत. यामुळे माझ्या मनात कनिष्ठतेची खोलवर भावना निर्माण झाली. हळूहळू हे द्वेष आणि मत्सरात बदलले.” असं तिने स्वत: च्या मुलाचा जीव घेतल्याचं कबूल केलं.
पोलिसांनी अटक केली अन् दोघांचा जीव वाचला..
चौकशीदरम्यान पूनमने असंही सांगितलं की ती कुटुंबातील आणखी दोघांना मारण्याचा कट रचत होती, त्यात तिच्या अवघ्या 18 महिन्यांच्या मुलाचाही समावेश होता. मात्र आता पूनम तुरूगांत गजाआड आहे, पोलिस चारही प्रकरणांमध्ये पुढील तपास व कारवाई करत आहेत.












