Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • शैक्षणिक बातम्या
  • अभियंत्यांसाठी मोठी संधी! हवाई दलात GATE आधारित भरती प्रक्रिया सुरू; ‘अशी’ असेल निवड प्रक्रिया
शैक्षणिक बातम्या

अभियंत्यांसाठी मोठी संधी! हवाई दलात GATE आधारित भरती प्रक्रिया सुरू; ‘अशी’ असेल निवड प्रक्रिया

Air Force

Air Force Officer Recruitment: अभियंत्यांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. भारतीय हवाई दलात तांत्रिक शाखेतील अधिकारी कॅडर भरती प्रक्रियेत बदल करत नवी योजना जाहीर करण्यात आली आहे.

भारतीय वायुसेनेत अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. AFCAT 02/2026 भरतीची अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली असून 20 मे 2026 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीमध्ये अभियांत्रिकी पदवीधारक उमेदवारांसाठी GATE स्कोअरच्या आधारे थेट निवडीची नवी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. फ्लाइंग आणि ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) शाखांमधील अधिकारी पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट afcat.edcil.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

हेही वाचा: UGC NET करेक्शन विंडो सुरू; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार सुधारणा, उमेदवारांसाठी शेवटची संधी!

फ्लाइंग ब्रँचसाठी पात्रता

फ्लाइंग ब्रँचसाठी उमेदवाराने 12वीमध्ये गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी (किमान 3 वर्षांची) किंवा BE/B.Tech पदवी असणे आवश्यक आहे. अॅरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाचे Section A आणि B उत्तीर्ण उमेदवारही पात्र ठरतात.

टेक्निकल ब्रँच पात्रता

या शाखेसाठी उमेदवाराकडे 12वीमध्ये गणित आणि भौतिकशास्त्र विषय असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित विषयातील बीएससी/एमएससी (भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स) किंवा 4 वर्षांची इंजिनिअरिंग/टेक्नॉलॉजी पदवी आवश्यक आहे.

अॅरोनॉटिकल इंजिनिअर (Mechanical) पात्रता

या पदासाठीही 12वीमध्ये गणित आणि भौतिकशास्त्र विषय अनिवार्य आहेत. यासोबतच उमेदवाराकडे 4 वर्षांची इंजिनिअरिंग/टेक्नॉलॉजी पदवी किंवा AMIE तसेच अॅरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाचे Section A आणि B पूर्ण असणे आवश्यक आहे.

GATE स्कोअरद्वारे थेट निवड

तांत्रिक शाखेतील काही पदांसाठी वैध GATE स्कोअरच्या आधारे उमेदवारांना थेट AFSB मुलाखतीसाठी बोलावले जाते. या पद्धतीत लेखी AFCAT परीक्षा द्यावी लागत नाही. उमेदवाराकडे संबंधित इंजिनिअरिंग शाखेतील BE/B.Tech पदवी आणि वैध GATE स्कोअर असणे आवश्यक आहे. हा स्कोअर मागील काही वर्षांसाठी वैध मानला जातो.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे. माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला. यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला. त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या. सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts