Trisha Krishnan Vijay Viral Video: अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चेन्नईतील फोर्ट सेंट जॉर्ज येथे झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात ती सहभागी झाली होती. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अभिनेत्री ट्रिशा कृष्णन (Trisha Krishnan) पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. चेन्नईतील फोर्ट जॉर्ज येथे पार पडलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात (Independence Day 2026) ट्रिशाने हजेरी लावली. यावेळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
कार्यक्रमातील विशेष बाब म्हणजे ट्रिशा विजय (Trisha- Vijay) यांच्या आई- वडिलांच्या शेजारी पुढच्या रांगते बसलेली दिसली. तिच्यासोबत तिची आई उमा कृष्णनही उपस्थित होती. कार्यक्रमादरम्यानचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर (Viral Video) मोठ्या प्रमाणात शेअरकेले जात आहेत.
विजयला पाहताच ट्रिशाने केला सलाम
कार्यक्रमातील एका व्हिडिओमध्ये विजय जीपमधून जात असताना ट्रिशा त्यांना सलाम करताना दिसते. याशिवाय विजयच्या आई- वडिलांशी ट्रिशाची भेट झाल्याचाही एक व्हिडिओ समोर आला आहे. दोन्ही बाजूंनी हसतमुखाने अभिवादन करण्यात आल्याचे या दृश्यांमध्ये दिसते.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ट्रिशाने सोनेरी रंगाची साडी परिधान केली होती. केसांमध्ये गजरा आणि कमीतकमी दागिने असा तिचा साधा आणि पारंपरिक लूक चाहत्यांशी लक्ष वेधून घेत आहे.
विजय- त्रिशाची जोडी पुन्हा चर्चेत
विजय आणि ट्रिशा यांनी यापूर्वी अनेक गाजलेल्या तमिळ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ‘घिल्ली’, ‘थिरूपाची’, ‘आथी’ आणि ‘कुरुवी’ या चित्रपटांमधील त्यांची जोडी प्रेक्षकांनी विशेष पसंत पडली. तब्बल काही वर्षांच्या अंतरानंतर दोघे ‘लिओ’ चित्रपटातून पुन्हा एकत्र पडद्यावर आले.
दोघांच्या अनेक सार्वजनिक कार्यक्रमांतील उपस्थितींमुळे त्यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर विविध चर्चा होत असतात. मात्र, दोघांनीही यापूर्वी आपल्या नात्याला मैत्रीचे स्वरूप असल्याचे सांगितले आहे.
VIDEO | Actor Trisha joins Independence Day function in Chennai; sits with Tamil Nadu CM Vijay’s parents.
(Full video available on PTI Videos – https://t.co/d8jp61yd2p) pic.twitter.com/vGqEMZahXU
— Press Trust of India (@PTI_News) August 15, 2026
संगीताच्या घटस्फोटाच्या प्रकरणाचीही चर्चा
दरम्यान, विजय यांच्या पत्नी संगीताने चेंगलपट्टू कौटुंबिक न्यायालयातील घटस्फोटाची याचिका मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. 7 ऑगस्ट रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर उपस्थित राहून त्यांनी प्रकरण पुढे न नेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर न्यायालयाने याचिका मागे घेतल्याची नोंद केली.
या पार्श्वभूमीवरच स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातील ट्रिशा आणि विजय यांच्या कुटुंबीयांशी संबंधित दृश्यांनी सोशल मीडियावरील चर्चेला पुन्हा वेग दिला आहे. मात्र, दोघांच्या वैयक्तिक नात्याबाबत सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.




