Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • बळीराजाची प्रतीक्षा संपणार? कर्जमाफीच्या निधीबाबत कृषिमंत्री भरणेंनी दिली मोठी अपडेट
ऍग्रो स्पेशल

बळीराजाची प्रतीक्षा संपणार? कर्जमाफीच्या निधीबाबत कृषिमंत्री भरणेंनी दिली मोठी अपडेट

Maharashtra Farmer Loan Waiver
16
Maharashtra Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीच्या निधीची प्रतीक्षा करणाऱ्या बळीराजासाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची माहिती दिली असून, पात्र लाभार्थ्यांच्या याद्यांची पडताळणी सध्या सुरू आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत (Maharashtra Farmer Loan Waiver) शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. कर्जमाफीच्या पात्र लाभार्थ्यांच्या याद्यांची पडताळणी सुरू असून, प्रक्रिया पूर्ण होताच संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये रक्कम जमा केली जाणार असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे. अनेक लाभार्थ्यांनाअद्याप रक्कम मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये (Farmer Loan Waiver Maharashtra) प्रतीक्षा कायम आहे. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्र्यांनी (Dattatray Bharne) लवकरच मोठ्या प्रमाणात निधी वितरित केला जाणार असल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा: युवकांसाठी मोठी घोषणा! मोदींचा ‘सप्तधारा’ मंत्र; 2047 च्या विकसित भारतासाठी या 7 क्षेत्रांवर राहणार फोकस

यादी अंतिम होताच खात्यात पैसे (Maharashtra Loan Waiver Scheme)

कृषिमंत्र्यांच्या माहितीनुसार, ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती तपासण्याचे काम सुरू आहे. पात्रता निश्चित झाल्यानंतर आणि यादी अद्ययावत झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा केली जाणार आहे.

सरकारकडे निधी उपलब्ध असून, येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात रक्कम वितरित होण्याची शक्यता असल्याचे भरणे यांनी सांगितले. या कर्जमाफीचा एकूण आर्थिक भार सुमारे ४० हजार ५८५ कोटी रुपये असल्याची माहितीही त्यांनी दिली.

शहरातील शेतकऱ्यांसाठीही योजनांचा विचार

दरम्यान, शहरी भागात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचन विहीर तसेच अन्य कृषी योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याचा मुद्दा पत्रकारांनी कृषिमंत्र्यांसमोर मांडला. याबाबत आवश्यक तरतूद करून अशा शेतकऱ्यांनाही विविध योजनांच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन भरणे यांनी दिले.

सातबारा नोंद नसलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे पाऊल

दुसरीकडे, सातबारा उताऱ्यावर किंवा इतर अधिकार नोंदींमध्ये नाव नसलेल्या शेतकऱ्यांनाही शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी महसूल विभागाने प्रक्रिया सुरू केली आहे.

अशा शेतकऱ्यांची माहिती संकलित करून त्यांना अधिकृत रेकॉर्डमध्ये आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे ॲग्रीस्टॅक नोंदणी, कर्जमाफी आणि इतर सरकारी योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग अधिक सुलभ होण्याची शक्यता आहे.

कर्जमाफीच्या निधीची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता पात्रता पडताळणी आणि लाभार्थी यादी अद्ययावत होण्याची प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts