• Home
  • Ganeshotsav 2026
  • गणपती बाप्पा मोरया तर सर्वच म्हणतात, पण मोरया ‘च’ का…?
Ganeshotsav 2026

गणपती बाप्पा मोरया तर सर्वच म्हणतात, पण मोरया ‘च’ का…?

Ganpati Bappa Morya Meaning
0350

गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया..!
हे घोषवाक्य आपण सर्वजण आनंदाने म्हणतो…
घराघरात श्रींचे आगमन झाले की,
साजूक मोदकांचा खुसखुशीत नैवेद्य,
आरतीचा गजर, अन भक्तीमय वातावरणात
हा जयघोष आपसूकच घुमतो…
पण तुम्हाला माहितीये का
गणपती बाप्पा मोरया च का म्हंटले जाते…
यामागे एक ऐतिहासिक कथा आहे….
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मोरगाव येथील
अष्टविनायकांपैकी एक असलेले मोरेश्वर मंदिर…
ही कथा आहे मोरया गोसावी मंदिराची.
मोरया गोसावी हे चिंचवड येथील रहिवासी असून
गणपती बाप्पांचे निष्ठावान भक्त होते,
पुण्यातील चिंचवड येथून 95 किलोमीटर वर असलेल्या
मोरेश्वर मंदिरात मोरया गोसावी दर्शनासाठी जात होते.
वयाच्या 117 वर्षापर्यंत त्यांनी नियमित दर्शनासाठी मंदिरात जात होते,
परंतु त्यानंतर त्यांना वृद्धापकाळाने मंदिरात जाणे शक्य होईना,
त्यामुळे ते दुखी राहत होते,
एकेदिवशी गणपती बाप्पांनी त्यांच्या स्वप्नात येऊन सांगितले कि,
मी पहाटे तू स्नान करत असताना दर्शन देईल,
त्याप्रमाणे पहाटे ते दर्शनासाठी गेले असतां
डुबकी मारल्यावर त्यांच्या हातात एक गणेशाची मूर्ती आली,
म्हण्टल्यानुसार बाप्पानी त्यांना दर्शन दिले,
त्यानंतर त्यांनी हि मूर्ती मंदिरात स्थापन केली.
तेव्हापासून गणपती बाप्पा मोरया म्हणण्याची प्रथा आहे…
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया हि फक्त एक जयघोष नसून
एक भक्ताच्या प्रेमाची, श्रद्धेची अन गणेशाशी असलेल्या नात्याची आठवण आहे.
पुढील भागात पाहूया
गणेशभक्तीची अद्भुत कथा – अनलासुर ते दुर्वा इथपर्यंतचा प्रवास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts