Top News

2026 या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शनी करणार या राशीत संक्रमण; या राशींना होणार फायदा

Saturn transit 2026 showing zodiac wheel with Shani planet and highlighted benefiting zodiac signs

Saturn transit 2026 benefits : लवकरच नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. प्रत्येकाला 2026 हे वर्ष कसे जाईल याची उत्सुकता आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात ग्रहांची स्थितीनुसार फरक जाणवतो. त्याचप्रमाणे यंदाच्या नवीन वर्षात ग्रहांची स्थिती कशी राहील हे आपण पाहणार आहोत.

वैदिक शास्त्रानुसार 2026 या नवीन वर्षात अनेक छोट्या-मोठ्या ग्रहांचे संक्रमण होणार आहे. या ग्रहांमध्ये न्यायदेवता आणि कर्मफळदाता शनिचा देखील सहभाग असेल असे. कारण नवीन वर्षात शनिची वक्री तथा मार्गी चाल होणार असल्याचे शास्त्रात म्हंटले आहे. 2026 मध्ये मार्च आणि एप्रिल महिन्यात अस्त आणि उदय होणार असल्याने त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर पाहायला मिळेल. काही राशींना याचा फायदा होईल. तर काही राशींना नुकसान भोगावे लागू शकते. 2026 मध्ये होणाऱ्या संक्रमणाचा कोणत्या राशीला लाभ होईल हे आपण जाणून घेणार आहोत.

मकर

2026 या नवीन वारसाची सुरुवात मकर राशींच्या व्यक्तीसाठी फायदेशीर ठरणार आहे. या वर्षात मकर राशीच्या

व्यक्तींच्या जीवनात शनिची चाल लाभदायी ठरणार असल्याचे वास्तुशास्त्रात सांगण्यात येत आहे. मकर राशीच्या तिसऱ्या चरणात शनि देव प्रवेश करणार आहे. शनीच्या संक्रमणाने तुमच्या साहस आणि पराक्रमात वाढ होऊ शकते. याशिवाय, तुमची अतिआवश्यक कामे वेळेत पूर्ण होतील. तुम्ही व्यावसायिक क्षेत्रात असाल तर प्रगती जाणवेल. सामाजिक क्षेत्रामधील व्यक्तींना मान-सन्मान मिळेल. त्यांची प्रतिष्ठा वाढेल. या नवीन वर्षात घर किंवा वाहन खरेदी करण्याचे योग्य आहेत.

हे ही वाचा : अमावस्या काळी रात्र तर, पौर्णिमा शुभ्रतेचा चंद्र दोन्ही मधला फरक माहितीय का?

कुंभ

नवीन वर्षात कुंभ राशीसाठी शनिची चाल अनुकूल ठरणार असल्याचे शास्त्रात सांगितले आहे. या नवीन वर्षात शनी कुंभ राशीच्या दुसऱ्या चरणात संक्रमण करणार आहे. जेणेकरून तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. याशिवाय, तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीत प्रमोशन होईल. सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर आर्थिक स्थिती सुधारेल.

मिथुन

यंदाचे 2026 हे नवीन वर्ष शनीच्या चालीने मिथुन राशीसाठी महत्वपूर्ण बदल घडवणार आहेत. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या करिअर आणि व्यवसायावर चांगला परिणाम दिसून येणार आहे. एवढेच नाही तर याकाळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. व्यवसायिक क्षेत्रात लाभ होईल. याकाळात तुमचं मन प्रसन्न राहील. नोकरीत प्रमोशन मिळेल. आयुष्यत सकारात्मकता जाणवेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts