Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे जिल्हातील सर्व जागांवर महायुतीचा बोलबाला, मविआ नावालाही शिल्लक नाही.. 
ताज्या बातम्या

पुणे जिल्हातील सर्व जागांवर महायुतीचा बोलबाला, मविआ नावालाही शिल्लक नाही.. 

Maha Yuti sweeps all Pune seats

Maha Yuti sweeps all Pune seats : राज्यभरातील एकूण २८८ नगरपरिषद, नगरपंचायतींचे निकाल हाती येत आहेत. महापालिकेच्या दृष्टीने या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. केवळ महायुतीच नव्हे तर महाविकास आघाडीतील पक्षही अनेक ठिकाणी एकमेकांविरुद्ध रिंगणात उतरले होते. त्यामुळे आजच्या निकालाबाबत संपूर्ण राज्याला कमालीची उत्सुकता लागली होती. पुणे जिल्ह्यात तर अनेक ठिकाणी महायुतीमध्येच ही निवडणूक रंगल्याच दिसून आलं.

दरम्यान, आता पुणे जिल्ह्यातील सर्वच नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. हाती आलेल्या निकालानुसार, महायुतीने नाबाद १७ पैकी १७ जागांवर निर्विवाद विजय संपादन केला आहे. पुणे जिल्ह्यात एकूण १४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायती आहेत. यापैकी अनेक ठिकाणी महायुतीतील उमेदवार आमने-सामने होते. तर विरोधी पक्ष कुठेच दिसून आला नसल्याचे चित्र स्पष्ट आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात होऊ घातलेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दृष्टीने हा मोठा धक्का मानला जात आहे. पुणे जिल्ह्यात विरोधी पक्ष नावालाही शिल्लक राहिला नसल्याचे चित्र आहे.

हेही वाचा – बीड जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद निवडणुकींचे निकाल एका क्लिकवर

पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडी नावालाही शिल्लक नाही

पुणे जिल्ह्यात १४ नगरपरिषदा आहेत, त्यापैकी ८ जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर भाजप आणि शिंदे गटाला प्रत्येकी ३ ठिकाणी विजय मिळवता आलाय. तर ३ नगरपंचायतींमध्ये अजित पवार गटाला २ तर एका जागेवर शिंदे गटाला विजय मिळवता आला आहे. त्यामुळे एकंदरीत निकालांच्या आकड्यांकडे नजर टाकली तर पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडी नावालाही शिल्लक राहिली नाही.

पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषदांच्या पक्षनिहाय विजयी उमेदवार

१ बारामती- सचिन सातव – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट

२ लोणावळा – राजेंद्र सोनवणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट

३ तळेगाव – संतोष दाभाडे – भाजपा महायुती

४ दौंड – दुगदिवी जगदाळे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट

५ चाकण – मनीषा गोरे – शिवसेना शिंदे गट

६ शिरूर – ऐश्वर्या पाचरणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट

७ इंदापूर – भरत शाह – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट

८ सासवड – आनंदी काकी जगताप – भाजपा

९ जेजुरी – जयदीप बारभाई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट

१० भोर – रामचंद्र आवारे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट

११ आळंदी – प्रशांत कुराडे – भाजपा

१२ जुन्नर – सुजाता काजळे – शिवसेना शिंदे गट

१३ राजगुरुनगर – मंगेश गुंडा – शिवसेना शिंदे गट

१४ वडगाव मावळ – आंबोली ढोरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट

पुणे जिल्ह्यातील ३ नगरपंचायतीमधील पक्षनिहाय विजयी उमेदवार

१५ मंचर – राजश्री गांजले शिवसेना शिंदे गट

१६ माळेगाव – सुयोग सातपुते – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट

१७ उरुळी फुरसुंगी – संतोष सरोदे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts