Breaking News :
  • Home
  • लाईफस्टाईल
  • या ख्रिसमसला अनोख्या पद्धतीने करा डेकोरेशन; जाणून घ्या डेकोरेशन पासून फॅशन, गिफ्ट पर्यंतच्या सर्व आयडिया
लाईफस्टाईल

या ख्रिसमसला अनोख्या पद्धतीने करा डेकोरेशन; जाणून घ्या डेकोरेशन पासून फॅशन, गिफ्ट पर्यंतच्या सर्व आयडिया

Beautiful Christmas home decoration with lights, tree, stylish outfits and gift boxes
99

unique Christmas decoration ideas : डिसेंबर महिन्यात वातावरण अगदी बदलून जाते. या महिन्यात येणारा सण म्हणजे ख्रिसमस. ख्रिसमस निमित्त सर्वत्र फराळाचा सुवास दरवळतो. घरोघरी लागलेल्या लाईट्स, गिफ्ट्सची देवाणघेवाण, सर्वकाही असं मोहून टाकणारं वाटत. ख्रिसमस हा फक्त सण नाही तर तो सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा, कुटूंब नातेवाईकांमध्ये आनंद व्यक्त करणारा सण आहे. या सणासाठी तुम्ही देखील काही स्पेशल असे प्लॅन केले असतीलच. ड्रेसिंग स्टाईल, घर सजावट या सर्वच गोष्टींचा तुम्ही सध्या विचार करत असाल. चला तर मग आजच्या या लेखात जाणून घेऊया काही स्पेशल अपग्रेडेड स्टाईल. ज्यामुळे यंदाच्या ख्रिसमसला तुम्ही अनोखे दिसू शकतात.

होम डेकोरेशन

तुम्ही या ख्रिसमसला warm fairy lights, red green cusions, pine wreaths, chrismas कॉर्नर या सर्वांचा वापर करून घर सजवू शकतात. तुम्ही warm fairy lights सोफ्याच्या मागे किंवा पडद्यावर लावा. ज्यामुळे त्याचा प्रकाश भिंतीवर पडून वाईब तयार होईल. तसेच तुम्ही घरी पाईन लिव्ह्स हे रिबन, बेल्सने घरीच तयार करू शकतात. तुम्ही डेकोरेशन करणार असलेला रूम किंवा तुमचे संपूर्ण घर RED-Green थीमने डेकोरेट करू शकतात. त्यानुसार तुम्हाला उषा, पडदे टेबलर्नर्स हे थीम नुसार बदलावे लागतील. तुम्ही घरात scented candle वापरू शकतात. जसे कि, cinnamon, pine, vanilla या सुगंधाने घरात festive vibes आणू शकतात. घरात तुम्ही एक smaller असा क्रिसमस कॉर्नर तयार करून तेथे सुंदर असे क्रिसमस ट्री विकत आणून ठेऊ शकतात. किंवा स्वत घरी देखील हे ट्री तुम्ही तयार करण्यास प्राधान्य देऊ शकतात.

फॅशन ट्रेंड

हिवाळ्यात येणारा हा सण फॅशनसाठी बेस्ट आहे. तुम्ही या सणासाठी रेड वेलवेट आउटफिटला प्राधान्य देऊ शकतात. थंड वातावरणामुळे कोझी आणि स्टाईलिश लूक तुम्हाला मिळू शकतो. तुम्ही ओव्हरसाईज किंवा क्रॉप स्वेटर्स, स्कर्ट्स किंवा high waist jeans देखील स्टाईल करू शकतात. पुरुषांसाठी maroon किंवा Dark Green या कलर कॉम्बिनेशनमध्ये ब्लेझर आणि जॅकेट परिधान करू शकतात. एवढेच नाही तर स्वेटर आणि जीन्स देखील तुम्ही स्टाईल करू शकतात.

ख्रिसमस स्पेशल फूड्स

ख्रिसमस या सणासाठी तोंडाला पाणी आणणारे पदार्थ बनवले जातात. तुम्ही यंदा या सणासाठी प्लम केक तयार करू शकतात. याशिवाय जिंजरब्रेड कुकीज, सीनॅमन रोल्स, हॉट चॉकलेट, चॉकलेट पुडिंग देखील तुम्ही तयार करू शकतात. ही लहान मुलांसाठी ट्रीट ठरेल. तुम्ही या सणासाठी स्पेशल कुटुंबासोबत पदार्थ बनवू शकतात. हा सर्वात सूंदर अनुभव ठरेल.

गिफ्टिंग आयडिया

ख्रिसमस या सणाला तुम्ही गिफ्टिंग आयडिया शोधात आहात का ? मग तुम्ही कस्टमाइज मग गिफ्ट करू शकतात. किंवा scented candle hampers, handmade hampers, wellness gift boxes, photos frame, फॅशन आणि स्टायलिंग भेटवस्तू, टेक प्रेमींसाठी क्युट असे हेडफोन, होम डेकॉर गिफ्ट्स तुम्ही भेट्वस्तूच्या रूपात देऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

हळदाची पाने : आयुर्वेदिक गुणांचा अनमोल खजिना हल्लीम (Garden Cress Seeds): आरोग्यासाठी नैसर्गिक सुपरफूड स्नायूंची ताकद वाढवायची? रोज खा हे ७ प्रोटीन सुपरफूड्स! स्ट्रॉबेरी: गोड लाल आरोग्यदायी फळ सुंठ (Dry Ginger): आरोग्याचा खजिना