• Home
  • बिजनेस
  • 26 मार्चला शेअर मार्केट बंद राहणार का? जाणून घ्या शेवटच्या आठवड्यातील सुट्ट्यांची यादी
Top News

26 मार्चला शेअर मार्केट बंद राहणार का? जाणून घ्या शेवटच्या आठवड्यातील सुट्ट्यांची यादी

Stock Market Holidays

Stock Market Holiday: उद्या २६ मार्च रोजी रामनवमी साजरी केली जाणार आहे. अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होत आहे. या दिवशी ट्रेंडिग बंद राहणार की खुले. चला तर जाणून घेऊयात याबाबत अधिक सविस्तर माहिती

शेअर बाजारात गुंतवणूकदारांसाठी मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यात महत्वपूर्ण दिवस आहे. यंदा २६ मार्चला संपूर्ण देशात रामनवमीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. यामुळे शेअर बाजार बंद राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर 27 मार्च (शुक्रवार) पासून बाजार पुन्हा खुला होईल, पण 28 आणि 29 मार्च शनिवार व रविवार असल्याने सलग दोन दिवस बाजार बंद राहणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना या आठवड्यात मर्यादित ट्रेडिंग सत्रांमध्येच निर्णय घ्यावे लागणार आहेत.

हेही वाचा: घरच्या घरी कार धुताना ‘या’ चुका टाळा, नाहीतर महागड्या गाडीचे मोठे नुकसान होऊ शकते

शेवटच्या आठवड्यात शेअर बाजाराच्या सुट्यांची यादी

मार्चच्या शेवटच्या दिवसांत शेअर बाजारात सलग सुट्यांचा परिणाम दिसून येणार आहे. ३० मार्चला बाजार खुला राहणार आहे, पण पुढच्या दिवशी ३१ मार्च रोज महावीर जयंती असल्याने बाजार पुन्हा बंद राहणार आहे.

संपूर्ण यादी

२६ मार्च ( रामनवमी): बाजार बंद
२७ मार्च ( शुक्रवर): बाजार खुला
२८-२९ मार्च ( शनिवार- रविवार): वीकेंड सुट्टी
३० मार्च (सोमवार): बाजार खुला
३१ मार्च (महावीर जयंती): बाजार बंद

म्हणून मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बाजारात केवळ दोन दिवस व्यवहार होणार आहेत. गुंतवणूकदारांना या मर्यादित ट्रेडिंग दिवसांचा योग्य फायदा घेणे आवश्यक आहे.

पुढील महिन्यांतही सुट्या

३ एप्रिल – गुड फ्रायडे
१४ एप्रिल – डॉ. भीमराव अंबेडकर जयंती
१ मे – महाराष्ट्र दिवस
२८ मे – बकरीद
२६ जून – मोहर्रम

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts