लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय
Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.
DGCA report : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला एक महिना पूर्ण झाला असून, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या प्रकरणाचा 22 पानांचा प्राथमिक तपास अहवाल जाहीर केला आहे. या अहवालातून अपघाताच्या वेळची परिस्थिती आणि तांत्रिक बाबींबाबत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.
झाडाला पहिली धडक
विमान जमिनीवर कोसळण्यापूर्वी ते एका मोठ्या झाडावर आदळले होते. त्यानंतर विमानाने नियंत्रण गमावले आणि ते जमिनीवर कोसळले.
कमी दृश्यमानता
बारामती विमानतळावर लँडिंगसाठी किमान 5000 मीटर दृश्यमानता आवश्यक असताना, अपघातावेळी ती केवळ 2000 ते 3000 मीटर इतकीच होती. धुक्यामुळे वैमानिकांना धावपट्टीचा अंदाज घेण्यात अडचण आली असावी, असा अंदाज आहे.
FDR आणि CVR डॅमेज
अपघातानंतर लागलेल्या भीषण आगीमुळे ‘फ्लाईट डेटा रेकॉर्डर’ (FDR) उष्णतेने खराब झाला आहे. कॉकपीटमधील संभाषणाचा डेटा (CVR) सुरक्षितपणे काढण्यासाठी आता अमेरिकेतील तज्ज्ञ कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे. ब्लॅक बॉक्समधील डेटा मिळवण्यासाठी अमेरिकन विशेष टीम भारतात येणार आहे. या ‘रॉ डेटा’चे तांत्रिक विश्लेषण पूर्ण झाल्यावरच अंतिम अहवाल समोर येईल, ज्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो.
धावपट्टीच्या त्रुटी
बारामतीचे एअरफिल्ड ‘अनकंट्रोल्ड’ श्रेणीत येते. तेथील रनवे मार्किंग फिकट असणे आणि ‘टेबल-टॉप’ रनवे असणे हे घटकही अपघाताला कारणीभूत ठरल्याची शक्यता अहवालात वर्तवण्यात आली आहे.
वैमानिकाचा शेवटचा संदेश
विमान कोसळण्यापूर्वी वैमानिकाने रेडिओवर अत्यंत भीतीदायक शेवटचा संदेश दिला होता, ज्यातून अचानक नियंत्रण सुटल्याचे संकेत मिळतात.
प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.