• Home
  • महाराष्ट्र
  • अंबरनाथ उड्डाणपुलावर भीषण अपघात; शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार जखमी  
Top News

अंबरनाथ उड्डाणपुलावर भीषण अपघात; शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार जखमी  

ambernath accident

Ambernath flyover accident : अंबरनाथ येथील एका उड्डाणपुलावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार देखील उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू तर तीन जन जखमी झाले आहेत.या संपूर्ण घटनेचा थरार उडवणारा सीन सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार किरण चौबे याअंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत बुवापाडा प्रभागातून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आहेत. त्या प्रचार करून  घरी जात असताना हा संपूर्ण प्रकार घडल्याची माहिती पोलीसांकडून मिळाली आहे. कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली. वाहनावरील नियंत्रण सुटल्यावर समोरून येणाऱ्या तीन ते चार दुचाकीस्वारांना कारने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत दोन महापालिकेचे कर्मचारी आणि 2 पादचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा : मालेगाव चिमुरडी अत्याचार आणि हत्या, प्रकरणी कोर्टातून मोठी अपडेट

मृतांची नावे आली समोर

या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अंबरनाथ महापालिकेचे कर्मचारी शैलेश जाधव आणि चंद्रकांत अनर्थे, असे या कर्मचाऱ्यांचे नाव असून त्यांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय कारचालक लक्ष्मण शिंदे आणि एक पादचारी सुमित चेलानी या व्यक्तीचा देखील मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर या अपघातात तीन जण जखमी झाले आहे. जखमींमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार किरण चौबे देखील किरकोळ जखमी झाल्या. नेमक हा अपघात कसा घडला. या आपघटचे नक्की कारण काय याचा शोध पोलिस घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts