Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • तयारीला लागा! CBSE 10वी दुसऱ्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कोणत्या दिवशी कोणता पेपर
ताज्या बातम्या

तयारीला लागा! CBSE 10वी दुसऱ्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कोणत्या दिवशी कोणता पेपर

CBSE 10th exam

CBSE Class 10 Second Board Exam 2026: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) २०२६ साठी इयत्ता दहावीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही परीक्षा नेमकी कोणासाठी असते याबाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) २०२६ साठी इयत्ता दहावीच्या दुसऱ्या (इम्प्रूव्हमेंट) बोर्ड परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे. ही परीक्षा त्या विद्यार्थ्यांसाठी विशेष महत्वाची आहे, ज्यांना आधीच्या निकालात सुधारणा करायची आहे किंवा काही कारणांमुळे अपेक्षित गुण मिळवता आले नाही. बोर्डाच्या माहितीनुसार, सर्व पेपर्स आता १५ मे ते २१ मे या कालावधीत घेतले जाणार आहेत.

परीक्षेची सुरुवात १५ मे रोजी गणित विषयाने होईल. यानंतर १६ मे रोजी इंग्रजीचे पेपर होतील. १८ मे रोजी विज्ञान विषयाची परीक्षा होणार असून हा पेपर अनेक विद्यार्थ्यांसाठी निर्णायक मानला जातो.

हेही वाचा: माकडाने ३ महिन्यांच्या चिमुकलीला पळवले… स्वतःचे पिल्लू समजून दीड तास प्रेमाने जवळ ठेवले, भावनिक व्हिडिओ व्हायरल

१९ मी रोजी विविध भाषा विषयांचे पेपर आयोजित करण्यात आले आहेत. यात हिंदू, उर्दू, पंजाबी, बंगाली, तेलुगू, तमिळ यांसह इतर भाषांचा समावेश आहे. त्याच दिवशी काही परकीय भाषा आणि निवडक ऐच्छिक विषयांच्या परीक्षाही घेतल्या जाणार आहेत. पेपरचा कालावधी विषयांनुसार २ ते ३ तासांचा असेल.

20 मे रोजी संस्कृत, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि चित्रकला यांसारख्या विषयांची परीक्षा होईल. तर 21 मे रोजी समाजशास्त्राचा अंतिम पेपर घेऊन संपूर्ण परीक्षेचा समारोप केला जाईल. तरी संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी www.cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

विद्यार्थ्यांनी वेळापत्रक लक्षात घेऊन अभ्यासाचे नियोजन करावे, अशी सूचना बोर्डकडून करण्यात आली आहे. योग्य तयारी आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर या संधीचा फायदा घेत चांगले गुण मिळवता येऊ शकतात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts