• Home
  • महाराष्ट्र
  • मोठी बातमी! 10वी-12वीसाठी 17 नंबर फॉर्म भरण्याची शेवटची संधी; ‘या’ तारखेपर्यंत मुदत
ताज्या बातम्या

मोठी बातमी! 10वी-12वीसाठी 17 नंबर फॉर्म भरण्याची शेवटची संधी; ‘या’ तारखेपर्यंत मुदत

Maharashtra SSC HSC Form 17

Maharashtra SSC HSC Form 17: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जून-जुलैमध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी खासगी विद्यार्थ्यांना १७ क्रमांकाचा (Maharashtra SSC HSC Form 17) अर्ज भरून परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने केली जाणार असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख २१ मे निश्चित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र (Maharashtra) राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या माध्यमातून पाचवी किंवा आठवी उत्तीर्ण विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी खासगी उमेदवार म्हणून नोंदणी करू शकतात अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ.दीपक माळी यांनी दिली आहे.

हेही वाचा: सकाळच्या नाश्त्यासाठी फक्त १० मिनिटांत बनवा लुसलुशीत शाबू खिचडी; लगेच नोट करा रेसिपी

यापूर्वी अनेक शाळाबाह्य विद्यार्थ्यांना वेळेत नोंदणी करता आली नव्हती, त्यामुळे त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये या उद्देशाने ही विशेष संधी देण्यात आली आहे. याच अनुषंगाने जून-जुलै 2026 मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

नोंदणी करताना विद्यार्थ्यांना त्यांच्या सध्याच्या पत्त्यानुसार जिल्हा, तालुका, माध्यम व शाखेनुसार उपलब्ध शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांची यादी दिसेल. त्यातून एक संस्था निवडणे आवश्यक राहील.

निवडलेल्या शाळा किंवा महाविद्यालयाकडून परीक्षा अर्ज, प्रकल्प मूल्यमापन, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा तसेच इतर पूरक मूल्यमापनाची जबाबदारी पार पाडली जाईल. नोंदणी शुल्क ऑनलाइन भरल्यानंतर त्याची पावती विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध होईल.

खासगी विद्यार्थ्यांची नोंदणी नियमित शुल्कातच केली जाणार आहे. विलंब शुल्क किंवा मुदतवाढ दिली जाणार नाही, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts