• Home
  • महाराष्ट्र
  • पोलिसांच्या अजब तपासाची गजब कहाणी, मृत शिवानी अचानक पावली
Top News

पोलिसांच्या अजब तपासाची गजब कहाणी, मृत शिवानी अचानक पावली

Dead Shivani Found Alive

Dead Shivani Found Alive : अगदी हिंदी सिनेमाला शोभेल अशीच घटना जळगाव जामोद येथे घडली आहे. पोलिस खून झाल्याचे सांगून मोकळे झाले. तर डॉक्टरांनी मृत घोषित केलेली शिवानी झाली जिवंत अवस्थेत समोर आली. यानंतर ती अवतरली जळगाव जामोद पोलिस स्टेशनमध्ये. पोलिसांनी ज्या मुलीची हत्या झाल्याचा दावा करून तिच्या निर्दोष वडील आणि भावाला हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात टाकले होते. ती शिवानी कलमेगर ही तरुणी प्रत्यक्षात जिवंत असून स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाली आहे. या अजब घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवानी जिवंत आहे तर ती मुलगी कोण होती जिचा जळालेला मृतदेह सापडला असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

एप्रिल महिन्यात मध्यप्रदेशातील खकनार येथून शिवानी बेपत्ता झाली होती. त्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बुलढाण्यातील जळगाव जामोदच्या राजुरा धरण परिसरात एका अज्ञात महिलेचा शिर नसलेला आणि अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. मृतदेहाची कोणतीही वैद्यकीय किंवा डीएनए चाचणी न करता, पोलिसांनी तो मृतदेह शिवानीचाच असल्याचा अंदाज बांधला आणि तपासात घाई करत तिच्या निर्दोष वडिलांना आणि भावाला अटक केली.

निष्पाप पित्याला आणि भावाला तुरुंगात टाकले

खडकी गावातील शिवानी नावाची मुलगी एप्रिल महिन्यात अचानक बेपत्ता झाली होती. ती एका तरुणासोबत निघून गेल्याची चर्चा होती. तिच्या कुटुंबीयांनी 1 मे रोजी ती बेपत्ता झाल्याची रीतसर तक्रारही पोलिसात नोंदवली होती. मात्र, काही दिवसांतच अशा काही घडामोडी घडल्या की ज्यामुळे निष्पाप पित्याला आणि भावाला तुरुंगाची हवा खावी लागली.

आता पोलिसांसमोर मुख्य दोन आव्हाने

आता पोलिसांसमोर दोन मुख्य आव्हाने आहेत. पहिले म्हणजे तुरुंगात असलेल्या निर्दोष बाप-लेकाची सन्मानपूर्वक सुटका करणे आणि दुसरे म्हणजे, जळगाव जामोदमध्ये सापडलेला तो अज्ञात मृतदेह नेमका कोणाचा होता? त्या मृत तरुणीची ओळख पटवून खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे आता पोलिसांसाठी मोठी परीक्षा असणार आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदची ही घटना आपली पोलिस यंत्रणा किती निष्क्रिय आणि कुचकामी बनली आहे याचे उदाहरण आहे. ज्या मुलीच्या हत्येप्रकरणी वडील आणि भावाला फसवून त्यांना कारागृहात टाकणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी होत आहे. या संपूर्ण घटनेची आणि हत्या झालेल्या महिलेची सखोल चौकशी होऊन हे प्रकरण समोर येणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts