Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • “…तोपर्यंत अमेरिकेचे हल्ले सुरूच राहणार”, डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले युद्ध पेटण्याचे संकेत
Top News

“…तोपर्यंत अमेरिकेचे हल्ले सुरूच राहणार”, डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले युद्ध पेटण्याचे संकेत

Donald Trump | अमेरिका (America) आणि इस्त्रायल (Israel) या दोन देशांनी मिळून इराणवर (Iran) हवाई हल्ले (Air Strike) केले आहेत. इराणवर हल्ला केल्यानंतर या तिन्ही देशांमध्ये युद्ध चांगलंच पेटलं आहे. कारण अमेरिका-इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामनेई (Ayatollah Khameneni) यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता संतप्त इराणकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे. अशातच आता डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी हे युद्ध आणखी पेटण्याचे संकेत दिले आहेत.

हेही वाचा – युद्धाचा भडका आणि बाजारात उसळी! सोन्या-चांदीचे दर कडाडले, सोने 11 हजारांनी महाग तर चांदी…

एकिकडे इराणसोबत युद्ध सुरू असताना दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, “जोपर्यंत आमचे ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत अमेरिकेचे हल्ले सुरू राहणार आहेत. यासाठी आमचे लष्करी अभियान पूर्ण ताकदीने सुरू आहे. दुर्दैवानं या युद्धात अमेरिकेच्या काही लोकांचे जीव जातील, पण युद्धात असंच होत असतं.”

“मानवी सभ्यतेच्या विरोधात ज्या लोकांनी युद्ध छेडले आहे, त्या दहशतवाद्यांना अमेरिका सर्वात कठोर शिक्षा देईल. तसेच ज्या निष्पाप लोकांचे जीव गेले आहेत त्यांचाही बदला घेतला जाईल”, असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट इशारा दिला आहे.

पुढे ट्रम्प यांनी युद्ध आणखी वाढवण्याचे संकेत दिले आहेत. “मी इराणच्या सैन्य पोलिसांना आवाहन करतो की, त्यांनी हे हल्ले थांबवावेत आणि सुरक्षित राहावे. जर हल्ले नाही थांबवले तर मग पुढे मृत्यूसाठी तयार राहावे”, असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts