• Home
  • राजकारण
  • ईडी अॅक्शन मोडमध्ये! दिल्ली-गोव्यात छापेमारी केल्यानंतर ‘आप’ नेत्याला केली अटक, नेमकं प्रकरण काय?
Top News

ईडी अॅक्शन मोडमध्ये! दिल्ली-गोव्यात छापेमारी केल्यानंतर ‘आप’ नेत्याला केली अटक, नेमकं प्रकरण काय?

rape case 5

ED Arrests Deepak Singla | नुकतीचे अंमलबजावणी संचालनालयने (ED) मोठी कारवाई केली आहे. ईडीने आम आदमी पार्टीचे (AAP) नेते दीपक सिंगला (Deepak Singla) यांना अटक केली आहे. ईडीने पीएमएलए (PMLA) कायद्याच्या एका प्रकरणी दिल्ली आणि गोव्यात सकाळपासून छापे टाकले होते. ईडीने मनी लाँड्रिंग आणि बँक फसवणुकीच्या प्रकरणांसंदर्भात छापे टाकले होते. यादरम्यान बँक घोटाळा प्रकरणात दीपक सिंगला यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – घरी सोडतो म्हणत लिफ्ट दिली अन्…, पुण्यात धावत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार, कोरेगाव पार्क हादरलं

आप नेते दीपक सिंगला यांना अटक, नेमकं प्रकरण काय?

ईडीने 155 कोटी रुपयांच्या बँक घोटाळा प्रकरणात दीपक सिंगला यांना अटक केली आहे. महेश टिंबर प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित 155 कोटी रुपयांच्या बँक घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हा आर्थिक घोटाळा पंजाबमधील आधीच अटक करण्यात आलेल्या ‘आप’चे नेते संजीव अरोरा यांच्याशी जोडलेला असल्याचं म्हटले जातं आहे. तर ईडीने महत्त्वपूर्ण पुरावे गोळा करण्यासाठी एक मोठी देशव्यापी मोहीम राबवली, ज्यानंतर दीपक सिंगला यांना अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या पथकाने आज (18 मे) पहाटे दिल्ली आणि गोव्यातील सात वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले होते. हे छापे दीपक सिंगला, महेश सिंगला, अमरिक गिल आणि या प्रकरणातील इतर आरोपींच्या ठिकाणांना लक्ष्य करून टाकण्यात आले होते. अनेक तास चाललेल्या या छाप्यांदरम्यान तपास यंत्रणेला आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लाँड्रिंगचे महत्त्वपूर्ण पुरावे सापडले ज्यामुळे दीपक सिंगला यांना अटक करण्यात आली आहे.

हे प्रकरण महेश टिंबर प्रायव्हेट लिमिटेड आणि तिच्याशी संबंधित प्रवर्तकांविरुद्ध दाखल केलेल्या बँक कर्ज घोटाळ्याशी संबंधित आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सामील असलेल्या कंपन्या आणि आरोपींनी संगनमत करून बँकांकडून कर्जाच्या स्वरूपात मोठी रक्कम मिळवली आणि त्यानंतर फसवणुकीने 155 कोटी रुपयांचा घोटाळा केला. या घोटाळ्यात दीपक सिंगला यांचा थेट सहभाग असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे सिंगला यांना अटक करण्यात आली असून सध्या त्यांची चौकशी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts