Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • घरी सोडतो म्हणत लिफ्ट दिली अन्…, पुण्यात धावत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार, कोरेगाव पार्क हादरलं
Pune

घरी सोडतो म्हणत लिफ्ट दिली अन्…, पुण्यात धावत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार, कोरेगाव पार्क हादरलं

Pune Crime | पुण्यात (Pune) एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील मुंढवा कोरेगाव पार्कमध्ये (Koregaon Park Pune) एका महिलेवर धावत्या कारमध्ये बलात्कार (Rape Case) करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेनं संपूर्ण पुणे शहर हादरले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पीडित महिलेने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पुढीत तपास सुरु आहे.

हेही वाचा – चीनमध्ये भूकंपाचा तडाखा! 13 इमारती कोसळल्या, 7,000 नागरिकांचं स्थलांतर, बचावकार्य सुरू

पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये नेमकं घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये महिलेची रात्री पार्टीत एका व्यक्तीसोबत ओळख झाली होती. त्यानंतर ते पार्टी करून एकत्र हॉटेलमधून बाहेर पडले. बाहेर आल्यानंतर महिला घरी जात असताना त्या व्यक्तीने घरी सोडतो म्हणत तिला लिफ्ट दिली. त्यानंतर त्याने महिलेवर धावत्या कारमध्ये जबरदस्ती करत तिच्यावर बलात्कार केला.

या घटनेनंतर पीडित महिलेने कोरेगाव पार्क पोलीस स्थानकात धाव घेतली आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. कोरेगाव पार्कसारख्या गजबजलेल्या भागात चालत्या गाडीत महिलेवर बलात्कार (Koregaon Park Pune Rape Case) झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. तसेच महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.

पीडित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेत पुढील तपास करण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी संबंधित परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नसरापूरमध्ये एका तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची संतापजनक घटना घडली होती. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना ताजी असतानाच आता कोरेगाव पार्कमध्ये आणखी एक बलात्काराची घटना घडल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच या घटनेमुळे पुणेकरांनी संताप व्यक्त केला असून आरोपीला शोधून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts