Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • चीनमध्ये भूकंपाचा तडाखा! 13 इमारती कोसळल्या, 7,000 नागरिकांचं स्थलांतर, बचावकार्य सुरू
Top News

चीनमध्ये भूकंपाचा तडाखा! 13 इमारती कोसळल्या, 7,000 नागरिकांचं स्थलांतर, बचावकार्य सुरू

Earthquake in China | चीनमध्ये (China) निसर्गाचं रौद्ररूप पहायला मिळालं. आज (18 मे) पहाटे नैऋत्य चीनमध्ये एका शक्तिशाली भूकंपाचा (Earthquake) धक्का बसला. रिश्टर स्केलवर 5.2 तीव्रतेचा हा भूकंप चीनच्या ग्वांग्शी प्रांतातील लिउझोऊ शहरात झाला. या भूकंपामुळे लिउसोऊ शहराचे मोठे नुकसान झाले आहे. या भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या असून 7,000 नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत आहे.

हेही वाचा – केरळच्या राजकारणात नवा अध्याय! व्ही. डी. सतीशन यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती

भूकंपामुळे चीनमध्ये मोठे नुकसना, अनेक लोक गंभीर जखमी

भूकंपामुळे संबंधित परिसरात मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण भूकंपामुळे 13 इमारती कोसळल्या असून अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. तर सध्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना शोधण्यासाठी शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत दोन जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली असून एक व्यक्ती बेपत्ता आहे. तसेच प्रशासनाने आतापर्यंत 7,000 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.

भूकंपामुळे अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. तर ढिगाऱ्यामुळे आणि इतर अपघातांमध्ये जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या दिलेल्या माहितीनुसार, सध्या जखमींपैकी कोणाचीही प्रकृती चिंताजनक नाही. दिलासादायक बाब म्हणजे, भूकंप होऊनही बाधित भागात वीज, पाणी आणि गॅस पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असून रस्त्यावरील वाहतूकही सुरळीत चालू आहे.

दरम्यान, तीव्र भूकंपाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे अधिकाऱ्यांनी सुरक्षा तपासणी सुरू केली आहे. रेल्वे मार्ग आणि पायाभूत सुविधांच्या मजबुतीची चाचणी केली जात आहे. या तपासणीमुळे रेल्वे वाहतुकीस विलंब होऊ शकतो आणि प्रवाशांच्या वाहतुकीत व्यत्यय येऊ शकतो, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts