• Home
  • राजकारण
  • केरळच्या राजकारणात नवा अध्याय! व्ही. डी. सतीशन यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती
Top News

केरळच्या राजकारणात नवा अध्याय! व्ही. डी. सतीशन यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती

sathesan

Kerala New CM | केरळला आता नवे मुख्यमंत्री (Kerala New CM) मिळाले आहेत. नुकताच केरळच्या नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. आज (18 मे) तिरुवनंतपुरम सेंट्रल स्टेडियममध्ये केरळच्या नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी व्ही.डी.सतीशन (V. D. Satheesan) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

हेही वाचा – महाराष्ट्रात निवडणुकांचा माहोल! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ‘या’ दिवशी होणार; नागपूर पोटनिवडणुकीचीही घोषणा

व्ही. डी. सतीशन हे आज केरळच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. केरळचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांनी व्ही. डी. सतीशन यांनी केरळचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांचे अभिनंदन केले. तर या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि इतर अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेते उपस्थित होते.

या शपथविधी सोहळ्यात व्ही.डी.सतीशन यांच्यासह 20 सदस्यीय मंत्रिमंडळाचाही शपथविधी झाला. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला, के मुरलीधरन आणि केपीसीसी प्रमुख सनी जोसेफ तसेच इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) नेते पीके कुन्हालीकुट्टी, पीके बशीर, एन समसुद्दीन, केएम अब्दुल शाजी आणि व्हीईई यांचा समावेश होता. तसेच मॉन्स जोसेफ, शिबू बेबी जॉन, अनूप जेकब, सीपी जॉन, एपी अनिल कुमार, टी सिद्दीकी, पीसी विष्णुनाथ, रोझी एम जॉन, बिंदू कृष्णा, एम लिजू, केए तुलसी आणि ओजे जनिश यांनीही शपथ घेतली.

कोण आहेत व्ही. डी. सतीशन?

व्ही. डी. सतीशन यांनी 1990 साली विद्यार्थी संघटनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. 1996 मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. व्ही. डी. सतीशन हे मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यांनी केरळ उच्च न्यायालयात वकिलीही केली आहे. तसेच सतीशन यांनी 2021 ते 2026 या काळात केरळ विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले होते. तर एर्नाकुमल जिल्हातील परावूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं असून 2001 पासून ते या जागेवरून सलग आमदार म्हणून निवडून आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts