Breaking News :
  • Home
  • लाईफस्टाईल
  • Summer Urinary Burning: उन्हाळ्यात सतत लघवीला त्रास होते का? मग ‘हे’ घरच्या घरी करा उपाय!
Top News

Summer Urinary Burning: उन्हाळ्यात सतत लघवीला त्रास होते का? मग ‘हे’ घरच्या घरी करा उपाय!

Summer Urinary Burning

home remedies for urinary burning and summer health tips: उन्हाळा सुरु झाला आहे तुम्हाला उन्हाळी लागल्यासारखे होणे किंवा लघवीला जळजळ होत असेल, तर काळजी करू नका. घरच्या घरी काही सोप्या टिप्स वापरून सहज आराम मिळवा.

मार्चमध्ये अनेक ठिकाणी पारा ३५-३८°C पर्यंत पोहोचला आहे. या कडक उन्हामु ळे शरीरावर गंभीर परिमाण होऊ शकतात. दुपारी थोडेसे रस्तावर चालत असताना थकवा, चक्कर किंवा घामामुळे अंग खाजवणे, सतत थकवा जाणवणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. जर तुम्हाला सतत लघवी करताना जळजळ किंवा उन्हाळी जाणवत असेल, तर घाबरू नका. घरच्या घरी काही सोप्या उपायांनी तुम्हाला सहज आराम मिळवू शकतो.

हेही वाचा: Weight Loss Common Mistakes: डाएट आणि व्यायाम करूनही वजन काम होत नाही? मग या ४ चुका असू शकतात मुख्य कारण

 

भरपूर पाणी प्यावे

उन्हाळ्यात शरीरातील पाणी सतत कमी होते. त्यामुळे ऑफिस, घरी किंवा इतर ठिकाणी असल्यास दिवसातून किमान ३ ते ४ लिटर पाणी प्यावे. एकदम गटगट पाणी न पिता बसून सावकाश पाणी पिणे फायदेशीर असते.

ताजे फळे खावा

उन्हाळ्यात रसाळ हंगामी फळे खाणे अत्यंत आवश्यक आहे. कलिंगड, खरबूज, संत्री, द्राक्ष, काकडी यासारखी फळे शरीराला पाणी देतात, ऊर्जा टिकवतात आणि लघवी व्यवस्थित होण्यास मदत करतात.

लिंबूपाणी आणि नारळपाणी

लिंबूपाणी किंवा नारळपाणी प्याल्याने शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भरून जाते. यामुळे लघवीची जळजळ कमी होते आणि शरीर थंड राहते.

गूळ खावे

रोज सकाळी घरातून निघताना १ गुळाचा तुकडा खावे. याने लघवीची जळजळ कमी होते.

हलके अन्न खावे

उष्णतेत जास्त गोड, तिखट किंवा मसालेदार अन्न खाल्ल्याने लघवीची समस्या वाढते. हलके आणि घरच्या घरी बनवलेले अन्न खाल्ले तर शरीरावर जास्त ताण पडत नाही.

ताक किंवा मंठा प्यावे

दुपारी जेवण झाल्यावर एक ग्लास ताक किंवा मंठा प्यावे. याने आपले पचन सुधारते आणि आणि लघवीचा त्रास कमी होतो.

विश्रांती घ्या

उन्हाळ्यात जास्त वेळ बाहेर राहणे टाळा. शक्य असल्यास थंड छायेत विश्रांती घ्या, जेणेकरून शरीरातील पाणी टिकून राहते आणि लघवीचा त्रास कमी होतो.

डॉक्टरांचा सल्ला

जर लघवी करताना सतत जळजळ, रंग बदलणे किंवा वारंवार होणे असे लक्षण दिसले, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. कधीकधी यामागे युरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) किंवा इतर समस्या असू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts