Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • एकनाथ शिंदेंचा काँग्रेसला मोठा धक्का, बडा नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
Top News

एकनाथ शिंदेंचा काँग्रेसला मोठा धक्का, बडा नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

Congress Leader Join Shinde Group

Congress Leader Join Shinde Group : एकनाथ शिंदे यांनी बंडाळी केल्यापासून त्यांच्या पक्षात आतापर्यंत अनेक मोठ्या नेत्यांनी प्रवेश केला. पक्षफुटीचा सर्वाधिक फटका ठाकरे गटाला बसला असून त्यापाठोपाठ शरद पवार पक्षाला आणि काँग्रेला बसल्याचे दिसत आहे. मागील तीन वर्षापुर्वी महाविकास आघाडीला लागलेली ही आजतागत थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. त्याचे कारण म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. महायुतीमधील अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. मात्र हे यश महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीमध्ये टिकवता आलं नाही.

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने जोरदार पुनरागमन केलं. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि पुन्हा एकदा राज्यात महायुतीची सत्ता आली. दरम्यान विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीला गळती लागल्याचं पहायला मिळालं. महाविकास आघाडीमधील अनेक बड्या नेत्यांनी महायुतीची वाट धरली. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला, शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक मोठ्या नेत्यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसमधील काही नेत्यांनी देखील महायुतीमध्ये प्रवेश केला.

काँग्रेसचे सहकार नेते सुधाकर भारसाकडे शिंदे गटात दाखल

आता राजकीय वर्तुळातून आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसला पुन्हा एकदा एक मोठा धक्का बसला आहे. अमरावतीमधील काँग्रेसचे सहकार नेते सुधाकर भारसाकडे यांनी आपल्या समर्थकांसह आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. सुधाकर भारसाकडे यांच्यासह इतरही काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे हा अमरावती जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.

अमरावती जिल्ह्यातील राजकारण वेगळ्या दिशेने वळण्याची शक्यता

प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्याकडून बच्चू कडू यांच्यावर पक्ष विस्ताराची जबाबदारी देखील सोपवण्यात आली. बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता आमरावतीमधून पहिला मोठा पक्षप्रवेश शिवसेना शिंदे गटात होत आहे. सुधाकर भारसाकडे यांनी आपल्या समर्थकांसह आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांना मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे येत्या काळात अमरावती जिल्ह्यातील राजकारणाला वेगळं वळण मिळतंय का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts