• Home
  • बिजनेस
  • ऐन लग्नसराईत सोने चांदी चे भाव वधारले; जाणून घ्या आजचा भाव
ताज्या बातम्या

ऐन लग्नसराईत सोने चांदी चे भाव वधारले; जाणून घ्या आजचा भाव

Gold jewellery displayed in a showroom as gold prices rise during the wedding season

Gold silver price today wedding season : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत घट झाल्याचे पहायला मिळाले होते. परंतु आता लग्नसराई आल्याने सोन्याच्या किंमती परत वाढल्याचे चित्र दिसत आहे. आज सकाळच्या सुमारास इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव वाढला आहे. हा भाव वाढून प्रती 10 ग्राम 1 लाख 26 हजार 081 रुपये इतका झाला आहे. तर एक किलो चांदीचा भाव 1 लाख 59 हजार 025 रुपयांवर पोहचला आहे. म्हणजेच आता सोने आणि चांदी दोघांचे भाव वाढल्याने सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही मोठी बातमी आहे.

अखिल भारतीय सराफा संघानुसार, सोने आणि चांदीच्या किंमतीत स्थानिक करासह मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यानुसार जागतिक बाजारात सोने 4,164.30 डॉलर प्रति औंसवर तर चांदी मध्ये देखील वाढ होऊन 52.37 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. तर वायदे बाजारात सोन्याचा दर वाढून 1 लाख 25 हजार 700 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. तर चांदीचा एका किलोसाठीचा भाव 1 लाख 57 हजार 709 रुपयांवर वधारला आहे.

सोन्याची किंमत वाढली

गुडरिटर्न्स नुसार मंगळवारी 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 1 ग्रॅम नुसार191 रुपयांची वाढ झाली होती. तर बुधवारी 1 ग्रॅम सोन्याची किंमत 87 रुपयांनी वाढली होती. आणि आज सकाळच्या सुमारास यामध्ये आणखी वाढ झाल्याचे दिसले. त्यानुसार एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 12 हजार 807 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 11 हजार 741 रुपये इतका झाला आहे.

हे ही वाचा : शेअर बाजारात जबरदस्त तेजी, निफ्टीनं गाठला विक्रमी उच्चांक; सेन्सेक्सनंही घेतली 300 अंकांची उसळी

चांदी ही वधारली

25 नोव्हेंबर म्हणजेच मंगळवारी चांदीच्या भावात देखील बदल बघायला मिळाला. त्यानुसार चांदी किलोमागे 4 हजार रुपयांनी वाढरल्याचे दिसले होते. तर बुधवारी हा भाव 2 हजारांनी वधारला. याशिवाय आज सकाळच्या सुमारास हा भाव आणखी 4 हजार रुपयांनी वाढल्याचे सराफा बाजारात दिसून आले. तर गुडरिटर्न्सनुसार 1 किलो चांदीचा आजचा भाव हा 1 लाख 73 हजार रुपयांनी वधारला आहे.

लग्नसराई लागल्याने हे भाव वाढत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. गेल्या तीन दिवसांपासून सोने चांदीने उचांकी गाठली आहे. सोने चांदीच्या किमतीत अजून वाढ होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. परंतु भाव वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये नाराजी दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts