Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • बारावीत यंदा 89.79 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; गुणपडताळणीसाठी कसा करायचा अर्ज? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस
ताज्या बातम्या

बारावीत यंदा 89.79 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; गुणपडताळणीसाठी कसा करायचा अर्ज? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस

How To Apply For Marks Verification : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तर्फे घेण्यात आलेल्या बारावी ( इयत्ता 12 वी) परीक्षा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. फेब्रुवारी – मार्च 2026 मध्ये पार पडलेल्या या परीक्षेचा एकूण निकाल यंदा 89.79 टक्के इतका लागला आहे. पत्रकार परिषदेत बोर्डानं सविस्तर आकडेवारी जाहीर करत विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम दिला. राज्यातील 9 विभागीय मंडळांमध्ये पुन्हा कोकण विभागानं बाजी मारली असून लातूर पॅटर्न फेल झाल्याचं पाहायला मिळालं. यावर्षी कोकण विभागाचा निकाल 94.14 टक्के इतका निकाल लागला आहे.

हेही वाचा : बारावीचा निकाल आज जाहीर; राज्यात यंदाही कोकण विभागाने मारली बाजी,

गुणांची पडताळणी करण्यासाठी कसा करायचा अर्ज :

बारावीच्या ऑनलाईन निकालानंतर आता ज्या विद्यार्थ्याला कोणत्याही विशिष्ट विषयात मिळवलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीनं 3 मे पासून अर्ज करता येईल. त्यासाठी संबंधित वाद्यार्थ्याला मंडळाच्या http://verification.mh-hsc.ac.in या अधिकृत संकेतस्थळावरुन स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना देखील संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.

उत्तरपत्रिकेची छायाप्रत अनिवार्य :

फेब्रुवारी-मार्च 2026 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचं पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीनं अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणं अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्तीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीनं अर्ज करणं आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचं पुनर्मूल्यांकन करावयाचं असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

  • यंदाही निकालात मुलींनी आपली आघाडी कायम ठेवली आहे.
  • मुलींची उत्तीर्ण टक्केवारी: 93.15%
  • मुलांची उत्तीर्ण टक्केवारी: 86.80%

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts