• Home
  • ताज्या बातम्या
  • अंडर-19 विश्वचषकात टीम इंडियाची विजयी सुरुवात; अमेरिकेचा दारुण पराभव
Top News

अंडर-19 विश्वचषकात टीम इंडियाची विजयी सुरुवात; अमेरिकेचा दारुण पराभव

IND U19 Beat USA U19

IND U19 Beat USA U19 : भारत आणि अमेरिका यांच्यातील 19 वर्षांखालील विश्वचषकात 2026 चा पहिला सामना आज, 15 जानेवारी रोजी बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब इथं खेळवण्यात आला. भारतानं डीएलएस पद्धतीनं सामना जिंकला. पावसानं प्रभावित झालेल्या सामन्यात टीम इंडियानं 6 विकेट्सनं विजय मिळवला. मात्र, भारताचा 196 वर्षांखालील संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे आणि स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी दोघंही या सामन्यात अपयशी ठरले.

अभिज्ञान कुंडूची दमदार फलंदाजी :

14 वर्षीय वैभव सूर्यवंशी 4 चेंडूत 2 धावा काढून बाद झाला. आयुष म्हात्रेनंही 19 धावा केल्या. अभिज्ञान कुंडूनं सर्वाधिक 42 धावा केल्या आणि तो नाबाद राहिला. कनिष्क चौहानही 10 धावा करुन नाबाद राहिला. भारताचं लक्ष्य 108 धावांचे होते. मात्र, पावसामुळं लक्ष्य 37 षटकांत 96 धावांवर कमी झाले. भारतानं 17.2 षटकांत लक्ष्याचा पाठलाग केला.

अमेरिकेचा संघ 107 धावांत गारद :

भारतीय कर्णधार आयुष म्हात्रेनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय चांगला ठरला. अमेरिकेनं पूर्ण 50 षटकंही खेळली नाहीत. अमेरिकेचा संघ 35.2 षटकांत 107 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून हेनिल पटेल हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्यानं 7 षटकांत 16 धावांत 5 बळी घेतले. त्याच्या कामगिरीबद्दल पटेलला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

टीम इंडियाची दमदार गोलंदाजी :

भारताकडून हेनिल पटेल व्यतिरिक्त, दीपेश देवेंद्रन, आरएस अम्ब्रीश, खिलन पटेल आणि वैभव सूर्यवंशी यांनी धावा केल्या. अमेरिकेकडून नितीश सुदिनीनं सर्वाधिक 36 धावा केल्या. अदनीत झांबनं 18 धावा केल्या. साहिल गर्ग आणि अर्जुन महेश यांनी प्रत्येकी 16 धावा केल्या. या चार खेळाडूंव्यतिरिक्त अमेरिकेचा कोणताही खेळाडू दुहेरी आकडा गाठू शकला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts