• Home
  • बिजनेस
  • शेअर बाजारात घसरण सुरुच, सेन्सेक्स 150 अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे ₹15 लाख कोटी बुडाले
ताज्या बातम्या

शेअर बाजारात घसरण सुरुच, सेन्सेक्स 150 अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे ₹15 लाख कोटी बुडाले

Share Market Today

Sensex Down : कमकुवत जागतिक संकेत आणि गुंतवणूकदारांच्या सावधगिरीमुळं भारतीय शेअर बाजारात घसरणीचा कल सुरुच आहे. 21 जानेवारी रोजी बाजार लाल रंगात उघडला, निफ्टी 25,250 च्या महत्त्वाच्या पातळीच्या खाली आला. सकाळच्या सुमारास सेन्सेक्स 150 अंकांनी घसरुन 82,039 वर पोहोचला, तर निफ्टी 25 अंकांनी घसरुन 25,207 वर पोहोचला. निफ्टीमध्ये डॉ. रेड्डीज लॅब्स, ग्रासिम, कोल इंडिया, जेएसडब्ल्यू स्टील आणि ओएनजीसीचे शेअर्स वाढले. दरम्यान, भारती एअरटेल, श्रीराम फायनान्स, अपोलो हॉस्पिटल्स, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिसचे शेअर्स लाल रंगात सुरु झाले. (Sensex Down)

गुंतवणुकदारांचं ₹15 लाख कोटींचं नुकसान :

बाजारपेठेतील दबावामुळं कंपन्यांच्या बाजार भांडवलावरही परिणाम झाला. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 468 लाख कोटींवरुन सुमारे 453 लाख कोटींवर आलं. गुंतवणूकदारांसाठी हा तीन दिवसांचा तोटा होता, ज्यामुळं अंदाजे 15 लाख कोटींचं नुकसान झालं.

खालील कंपन्यांचे आज येणार रझल्ट्स :

आज, 21 जानेवारी 2026 रोजी, अनेक प्रमुख कंपन्या त्यांचे डिसेंबर तिमाहीचे (FY२६ च्या तिसऱ्या तिमाहीचे) आर्थिक निकाल जाहीर करतील. यामध्ये डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, इटरनल, बँक ऑफ इंडिया, कॅनरा एचएसबीसी लाईफ इन्शुरन्स, बजाज कंझ्युमर केअर, डालमिया भारत, एपॅक प्रीफॅब टेक्नॉलॉजीज, हिंदुस्तान पेट्रोलियम, जिंदाल स्टेनलेस, केईआय इंडस्ट्रीज, पीएनबी हाऊसिंग फायनान्स, सुप्रीम इंडस्ट्रीज, टाटा कम्युनिकेशन्स, यूटीआय अ‍ॅसेट मॅनेजमेंट आणि वारी एनर्जीज यांचा समावेश आहे. गुंतवणूकदार या कंपन्यांच्या तिमाही कामगिरीवर बारकाईनं लक्ष ठेवतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts