• Home
  • महाराष्ट्र
  • लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ई-केवायसी प्रक्रियेसाठी आता ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ
Top News

लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ई-केवायसी प्रक्रियेसाठी आता ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

website 89

Extension of deadline for e-KYC process : राज्यातील लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांची ई-केवायसी प्रक्रियेसाठी यापूर्वी देण्यात आलेली मुदत आज १८ नोव्हेंबर रोजी संपुष्टात आली. मात्र, त्यापूर्वीच राज्य शासनाकडून ई-केवायसी प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे अद्याप ई-केवायसी करू न शकलेल्या महिलांन हा मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांत राज्यात निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्ती आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेता, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली ई-केवायसी करण्याची तारीख 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

अलीकडील नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच काही महिलांच्या पती किंवा वडिलांचे निधन झाल्यामुळे संबंधित आधार क्रमांकावर ओटीपी प्राप्त होणे अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत अपूर्ण ई-केवायसी प्रक्रियेस मुदतवाढ देणे आवश्यक आहे असं आदिती तटकरे म्हणाल्या. तसेच, ज्या पात्र महिलांच्या पती किंवा वडील हयात नाहीत किंवा ज्या महिला घटस्फोटित आहेत अशांनी स्वतःची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचा आदेश यांची सत्यप्रत सादर करणे आवश्यक राहील.

हेही वाचा – सलमानपासून ते अमिताभ बच्चनपर्यंत बाळासाहेब ठाकरेंनी प्रत्येक स्टारला केली मदत; जाणून घ्या त्यांच्याबद्दल

ई-केवायसी प्रक्रियेस 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ

या अनुषंगाने पात्र महिलांना न्याय मिळावा आणि कोणतीही पात्र महिला तांत्रिक किंवा अपरिहार्य कारणांमुळे योजनेपासून वंचित राहू नये, ही शासनाची भूमिका आहे. याकरिता माननीय मुख्यमंत्री व दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या हिताचे भान राखत ई-केवायसी प्रक्रियेस 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच विस्तारित कालावधीत लाभार्थींनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही मंत्री तटकरे यांनी केले आहे.


शेवटच्या टप्प्यात लाडक्या बहीणींची वाढली होती धाकधूक

ई-केवायसी करताना महिलांना अनेक अडचणी येत होत्या. ओटीपी सेंट केल्यानंतर ही तो महिलांना मिळत नव्हता. त्यामुळे ई केवायसी करण्यास अडचण येत होती. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात लाडक्या बहीणींची धाकधूक वाढली होती. त्यामुळे ई केवायसी करण्यास मुदतवाढ मिळणार की नाही याकडे महिलांचे लक्ष लागले होते. पण आता त्यांचा जीव भांड्यात पडला आहे. त्यांना 31 डिसेंबरपर्यंतकेवायसी करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts