Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • “बाप कशाला काढता…”, विधानभवनात हायव्होलटेज ड्रामा, दोन आमदार एकमेकांना भिडले
ताज्या बातम्या

“बाप कशाला काढता…”, विधानभवनात हायव्होलटेज ड्रामा, दोन आमदार एकमेकांना भिडले

Maharashtra Budget Session 2026 | सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session 2026) सुरू आहे. तर या अधिवेशनादरम्यान आज विधान भवनाच्या लॉबीत मोठा राडा झाल्याचं पहायला मिळालं. दोन आमदार आमने-सामने येताच दोघांमध्ये शा‍ब्दिक चकमक झाली आणि विधान भवनाच्या परिसरात मोठा गोंधळ उडाला.

हेही वाचा – अजित पवारांच्या विमानाच्या ब्लॅक बॉक्सबाबत रोहित पवारांचा खळबळजनक दावा, म्हणाले, तो डॅमेज झाला नाही…

तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आज पुन्हा एकदा अधिवेशनाला सुरूवात झाली. यावेळी विधान भवनाच्या लॉबीमध्ये भाजपा आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) आणि उद्धवसेनेचे आमदार भास्कर (Bhaskar Jadhav) जाधव आमने-सामने आले. या दोघांमध्ये जोरदार वाद झाल्याचं समोर आलं. तर सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

भास्कर जाधव आणि कल्याण शेट्टी यांच्यात काय शा‍ब्दिक चकमक झाली?

भास्कर जाधव आणि कल्याण शेट्टी यांच्यात कागदपत्रावर स्वाक्षरी करण्याच्या वादातून हा प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये असं दिसत आहे की, भास्कर जाधव हे संतप्त होत परवा आम्हाला राज्यपालांचं भाषण मिळालं नाही असं म्हणतात. तर त्यावर सचिन कल्याणशेट्टी बाप कशाला काढता, तुम्हाला बाप काढायचा अधिकार आहे का? असा प्रश्न विचारतात. यावर जाधव हो आहे असं संतापून म्हणतात. मग तुम्ही सीनिअर आहात आणि असं विधाव करता असं कल्याणशेट्टी म्हणतात. त्यावर ठीक आहे, तुम्ही एवढ्यावर थांबा मीदेखील थांबतो, असं म्हणत जाधव वाद संपवण्याचा प्रयत्न करतात.

नंतर सचिन कल्याणशेट्टी पुन्हा एकदा तुम्ही बाप काढायला नको होता, असं विधान करतात. त्यावर भास्कर जाधव आणखी आक्रमक होत जर तुम्हाला परत परत तेच बोलायचं असेल तर मी काढणार, तुम्हाला काय करायचं ते करा, असं म्हणतात. त्यावर आम्हीही तुमचा बाप काढू असं कल्याणशेट्टी म्हणतात. मग यावर जाधव म्हणतात, काढा तुम्हाला काढायचा असेल तर, आम्ही काही चुकीचं केलं नाही. याला उत्तर देत कल्याणशेट्टी म्हणतात, तुमच्याकडून शिकायची गरज नाही, मी सत्ताधारी पक्षात आहे. मग भास्कर जाधव पुन्हा संतापतात आणि असू द्या सत्ताधारी पक्षाचे, आणखी दोन मंत्री असू द्या, इथं तुम्ही खासगी काम कसे करता? असा सवाल जाधव करतात, असं व्हिडीओतून दिसून येत आहे.

 

 

 

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts