Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • सातारा सोनगाव कचरा डेपोला भीषण आग; धुरामुळे वाहतुकीला मोठा अडथळा
ताज्या बातम्या

सातारा सोनगाव कचरा डेपोला भीषण आग; धुरामुळे वाहतुकीला मोठा अडथळा

Satara fire
75

Satara fire : सातारा शहराजवळ असलेल्या सोनगाव येथील नगरपालिकेच्या कचरा डेपोला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीचे प्रचंड लोट आणि दाट धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रस्त्यावरील वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

 धुरामुळे दिवसाढवळ्या दाट धुके

या आगीमधून निघणाऱ्या धुरामुळे परिसरात दिवसाढवळ्या पावसाळ्यासारखे दाट धुके पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. इतका दाट धूर पसरला होता की वाहनचालकांना भर उन्हात देखील गाड्यांचे लाईट लावून प्रवास करावा लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती.

काही काळ संपूर्ण परिसर अंधकारमय

दरम्यान, आगीच्या ज्वाळा जमिनीपासून तब्बल ५० फूट उंच उसळत असल्याचे पाहायला मिळाले, तर धुराचे मोठमोठे लोट परिसरात पसरल्यामुळे काही काळ संपूर्ण परिसर अंधकारमय झाल्याची स्थिती होती.

आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू

घटनेची माहिती मिळताच सातारा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच पाण्याचे टँकरही घटनास्थळी दाखल करण्यात आले आहेत.

प्रशासनाकडून सतर्कता बाळगण्याचे आवाहन

मात्र कचऱ्याचे प्रमाण मोठे असल्यामुळे ही आग पूर्णपणे आटोक्यात येण्यासाठी किमान दोन ते तीन दिवस लागू शकतात, अशी माहिती अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, नागरिकांनी या परिसरात सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts