• Home
  • ताज्या बातम्या
  • ‘केडीएमसी’तील अतिक्रमण ७ दिवसांत हटवा; अन्यथा गाई-म्हशींसह कमिशनर बंगल्यावर देणार धडक
ताज्या बातम्या

‘केडीएमसी’तील अतिक्रमण ७ दिवसांत हटवा; अन्यथा गाई-म्हशींसह कमिशनर बंगल्यावर देणार धडक

KDMC encroachment

KDMC encroachment : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील द्वारली पाडा येथील गुरचरण जमिनीवर भूमाफियांनी अतिक्रमण केले असून याबाबत महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करून देखील हे अतिक्रमण हटत नसल्याने येथील तक्रारदार नागरिकांनी केडीएमसीच्या आय प्रभाग कार्यालयात म्हशीसह धडक दिली.

50 गाई म्हशींसह आयुक्तांच्या बंगल्यावर धडक देण्याचा इशारा

गुरचरण जागेवरील अनधिकृत बांधकामांवर येत्या सात दिवसांत कारवाई करा अन्यथा 50 गाई म्हशींसह आयुक्तांच्या बंगल्यावर धडक देण्याचा इशारा आंदोलनकर्ते सौरभ पांडे यांनी दिला. यावेळी स्थानिक तक्रारदार नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते सौरभ पांडे, सौरभ सिंह, विनोद तिवारी उपस्थित होते.

भूमाफियांनी केडीएमसी अधिकाऱ्यांशी संगनमत

द्वारली पाडा येथे मोठी गुरचरण जागा होती. याठिकाणी भूमाफियांनी मोठ्या प्रमाणात चाळी बांधल्या आहेत. यामुळे गुरांना चरण्यासाठी जागाच शिल्लक राहिल्या नाहीत. भूमाफियांनी केडीएमसी अधिकाऱ्यांशी संगनमत करून या अनधिकृत चाळी उभारल्या आहेत.

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी म्हशीचा उपयोग

याबाबत केडीएमसीकडे वारंवार पत्रव्यवहार करून देखील पालिका यांवर कारवाई करत नसून केडीएमसी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी केडीएमसीच्या आय प्रभागात चक्क म्हशीला आणण्यात आले.

अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास टाळाटाळ

अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या व भूमाफियांना अभय देणाऱ्या प्रभाग क्षेत्र अधिकारी यांच्या विरोधात यावेळी आंदोलन करण्यात आले. येत्या सात दिवसांत या बांधकामांवर कारवाई न झाल्यास ५० गाई म्हशींसह केडीएमसी आयुक्तांच्या बंगल्यावर धडक देणार असल्याचा इशारा आंदोलनकर्ते सौरभ पांडे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts