• Home
  • राजकारण
  • मीरा-भाईंदर महापालिका अॅक्शन मोडवर, मीरा रोडच्या सृष्टी परिसरात अनधिकृत बांधकामांवर हातोडा
Top News

मीरा-भाईंदर महापालिका अॅक्शन मोडवर, मीरा रोडच्या सृष्टी परिसरात अनधिकृत बांधकामांवर हातोडा

Mira Bhayandar Illegal Construction Action

Crackdown on unauthorized constructions : मीरा रोडच्या सृष्टी परिसरातील रॉयल गार्डन बार तसेच जाफरी खाडी पात्रात आणि कांदळवन क्षेत्रात उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने आज अखेर कारवाई केली. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या तक्रारी, स्थळ पाहणी आणि गुन्हे दाखल होऊनही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. मात्र आज उशिरा का होईना महापालिकेने पावले उचलली.

हेही वाचा – शिस्तभंग! घड्याळाकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उल्हासनगर मनपा आयुक्तांचा दणका; तासभर बाहेरच रोखले

मीरा रोड स्मशानभूमीच्या मागे असलेल्या जाफरी खाडीमध्ये भराव टाकून कांदळवन क्षेत्रात बेकायदा तबेला उभारण्यात आला होता. या बाबतही वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या. गेले दोन वर्ष नालेसफाईच्या पाहणीदरम्यान खाडी पात्र व कांदळवन परिसरात झालेली अनेक अनधिकृत बांधकामे पालिकेच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. तरीदेखील कारवाई रखडलेली होती.

क्षेत्रातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश

राज्य मानवी हक्क आयोगाने ऑक्टोबर २०२४ मध्ये खाडी पात्र व कांदळवन क्षेत्रातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या वेळी महापालिकेने रॉयल गार्डन बार, तबेला तसेच अन्य दोन अनधिकृत बांधकामे हटविण्याचे शपथपत्र सादर केले होते. तीन महिन्यांत कारवाई करण्याची मुदत असूनही प्रत्यक्षात कोणतीही ठोस पावले उचलली गेली नव्हती.

कारवाईमुळे पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त

दरम्यान, ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर ३ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्याच्या नगर विकास विभागाने महापालिका आयुक्तांना लेखी पत्र पाठवून कार्यवाहीचा अहवाल मागविला. त्यानंतर आज संबंधित अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून उर्वरित बेकायदा बांधकामांवरही सातत्याने कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts