ताज्या बातम्या

नेत्यांकडून काटकसरीचे आव्हान आमदारांकडून हरताळ

PM Modi austerity appea

PM Modi austerity appeal : सध्या संपूर्ण देशात येणाऱ्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी जनतेला बचत करून काटकसरीने राहण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आले. त्यांच्या या आवाहनाला राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी प्रतिसाद देत अनेक निर्णय घेतले. मात्र, आता त्यांच्या या आवाहनाला आमदार व पक्ष कार्यकर्त्यांकडून हरताळ होत असल्याचे दिसून येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अंबलबजावणी

पंतप्रधान नरेन्द्र मोंदी यांनी देशवासियांना येणाऱ्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी काटकसरीने राहण्यास सांगितले. पेट्रोल व डिझेल यांचा कमीत कमी वापर करून जास्तीत जास्त बचत करण्यास संगितले स्वतः मोदी यांनी आपल्या या आवाहनाची अंबलबजावणी केली. मोदी यांनी आपल्या गाड्यांचा ताफा कमी केला व केवळ दोन गाड्यांचा ताफ्यांमध्ये ते फिरताना दिसले.

मोदींच्या आव्हानाला मुख्यमंत्र्याचा प्रतिसाद

नरेंद्र मोदींच्या आवाहनाला राज्याचे मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनीपण दुजोरा दिला. आज विधानसभेच्या कामकाजाला येताना स्वतः देवेंद्र फडणवीस हे टू व्हीलर वर येताना दिसले. विधानसभेत कामकाजासाठी मंत्री आशिष शेलार यांच्यासोबात येत त्यांनी परत एकदा जनतेला काटकसरीने व बचतीने वागण्याचा संदेश दिला. त्यासोबतच मंत्र्यांचे नियोजित विमान दौरे रद्द करण्याचा निर्णयपण मुख्यमंत्र्यांनी घेतला.

आमदाराकडून हरताळ

मोठे नेते जिथे काटकसरीने वागून लोकंना आवाहन करताना दिसत आहे तर आमदार मात्र त्यांच्या या आव्हानांना फाट्यावर मारताना दिसून येत आहेत. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार यांनी अनेक केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वागतार्थ प्रचंड बॅनरबाजी करताना दिसून आले. त्यांच्या या बँनरबाजीमुळे त्यांचे नाव सर्वत्र चर्चेत आल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे मंत्री नितीन गडकरी हे आज पालखी मार्गाची पाहणी करण्यासाठी पंढरपूरला आले असताना बसने प्रवास करताना दिसले तर दुसरीकडे मात्रत्यांच्या बसचच्या मागे ४० गाड्यांचा ताफा असल्य्याची बातमी समोर आली. या सगळ्या प्रकारामुळे राजकीय चर्चा चांगलीच रंगल्याची दिसत आहे .

आता हे सर्व मंत्री आपल्या दिलेल्या शब्दांवर किती ठाम राहतात याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts