Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • मुंबई विद्यापीठाला २० पदके! आविष्कार संशोधन स्पर्धेत उमटवली विजयाची मोहोर
Mumbai

मुंबई विद्यापीठाला २० पदके! आविष्कार संशोधन स्पर्धेत उमटवली विजयाची मोहोर

Mumbai University wins 20 medals

Mumbai University wins 20 medals : महाराष्ट्र राज्य १८व्या आंतर विद्यापीठीय आविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये (Invention Research Competition) मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) ८३ गुणांसह विजेतेपद पटकावले आहे. संशोधन महोत्सवामध्ये विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करून १४ सुवर्ण, १ रौप्य आणि ५ कांस्य पदकांची (14 gold, 1 silver and 5 bronze medals) कमाई करत सलग सातव्या वर्षी विजयी मोहोर उमटवली आहे. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाला एकूण २० पदके (Mumbai University won a total of 20 medals) मिळाली आहेत.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात २८ ते ३१ जानेवारीदरम्यान ही स्पर्धा झाली. लोक भवन आयोजित या स्पर्धेत २४ विद्यापीठांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक विद्यापीठाकडून या स्पर्धेसाठी मानव्यविद्या, भाषा आणि कला, वाणिज्य व्यवस्थापन आणि विधी, मूलभूत शास्त्र, शेती व पशु संवर्धन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान आणि वैद्यक शास्त्र व औषधशास्त्र या प्रवर्गातून ४८ संशोधन प्रकल्प पाठविले जातात. मुंबई विद्यापीठाने सादर केलेल्या ४८ पैकी २० संशोधन प्रकल्पांना पारितोषिके मिळाली.

सहाही प्रवर्गात गटनिहाय विजेतेपद प्राप्त

मुंबई विद्यापीठाने मानव्यविद्या, भाषा आणि ललित कला या प्रवर्गात तीन सुवर्ण आणि दोन कांस्य, वाणिज्य व्यवस्थापन आणि विधी या प्रवर्गात दोन सुवर्ण आणि एक कांस्य, मूलभूत शास्त्रे या प्रवर्गात तीन सुवर्ण आणि एक कांस्य, शेती व पशु संवर्धन या प्रवर्गात एक सुवर्ण आणि एक कांस्य, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान या प्रवर्गात दोन सुवर्ण, वैद्यक शास्त्र व औषधशास्त्र या प्रवर्गात तीन सुवर्ण, एक रौप्य पदक पटकावले आहेत. तसेच सहाही प्रवर्गात गटनिहाय विजेतेपद प्राप्त केले आहे.

शैक्षणिक परंपरेची साक्ष संशोधनाच्या क्षेत्रात मुंबई विद्यापीठाने सलग सातव्या वर्षी केलेली उज्वल कामगिरी ही विद्यापीठाच्या शैक्षणिक परंपरेची सशक्त साक्ष आहे, असे मत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संघ यंदा उपविजेता

आविष्कार स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संघ यंदा उपविजेता ठरला आहे. आविष्कार या राज्यस्तरीय स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत एकूण ११ पारितोषिके पटकावली. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी १ प्रथम, ६ द्वितीय, २ तृतीय व २ उत्तेजनार्थ पारितोषिके मिळवली आहे. ही स्पर्धा पदवी (UG), पदव्युत्तर तसेच पोस्ट पीजी या तीन स्तरांमध्ये आयोजित करण्यात आली होती.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आविष्कार स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली असून सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन.अविष्कार स्पर्धेसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध समित्यांनी व या समितीमध्ये काम करणाऱ्या सर्व सदस्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे हे यश प्राप्त झाले आहे, असे मत कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ सुरेश गोसावी यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts