• Home
  • देश
  • पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हल्ला, तीन क्रिकेटपटूंचा मृत्यू; बोर्डानं घेतला मोठा निर्णय
क्रीडा

पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हल्ला, तीन क्रिकेटपटूंचा मृत्यू; बोर्डानं घेतला मोठा निर्णय

चाणक्य नीति यश मिळवण्यासाठी एकजुटीने काम करणे गरजेचे समजून घ्या चाणक्य नीति चे सिद्धांत 6

काबुल : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या शेजारी देशांमध्ये सध्या तणावपूर्ण संबंध आहेत. पाकिस्ताननं हवाई हल्ला केला, ज्यामुळं अफगाणिस्तानचं मोठं नुकसान झालं. पाकिस्तानी हल्ल्यात उर्गुन जिल्ह्यात तीन स्थानिक क्रिकेटपटू ठार झाले. त्यानंतर अफगाणिस्ताननं एक मोठं पाऊल उचललं आणि पाकिस्तानच्या भूमीवर होणाऱ्या तिरंगी मालिकेतून माघार घेतली, ज्यामुळं पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून शोक व्यक्त : अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की, पाकिस्तानी राजवटीनं आज संध्याकाळी केलेल्या भ्याड हल्ल्यात लक्ष्य केलेल्या उर्गुन जिल्ह्यातील (कबीर, सिबगतुल्लाह आणि हारुन) शहीद झालेल्या क्रिकेटपटूंबद्दल एसीबी तीव्र शोक व्यक्त करते. या खेळाडूंसह इतर पाच जणांचा मृत्यू झाला होता, तर इतर सात जण जखमी झाले होते. हे खेळाडू मैत्रीपूर्ण सामन्यात सहभागी होण्यासाठी शरण इथं गेले होते. उर्गुन परतल्यानंतर त्यांना लक्ष्य करण्यात आलं.

एसीबीचा मोठा निर्णय :

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं म्हटलं आहे की ते या कृत्याला त्यांच्या खेळाडू आणि क्रिकेट समुदायाचं मोठं नुकसान मानतात. ते शोकग्रस्त कुटुंबांसोबत तीव्र शोक आणि एकता देखील व्यक्त करतात. या घटनेनंतर, अफगाणिस्ताननं तिरंगी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

 

तिरंगी मालिका संकटात :

अफगाणिस्तान, श्रीलंका आणि पाकिस्तान हे पाकिस्तानच्या भूमीवर होणाऱ्या तिरंगी मालिकेत सहभागी होणार आहेत. मात्र अफगाणिस्ताननं माघार घेतल्यानं ही मालिका मोठ्या संकटात सापडली आहे, ज्यामुळं ती रद्द होण्याची शक्यता वाढत चालली आहे. तिरंगी मालिकेचे पहिले दोन सामने रावळपिंडीमध्ये आणि अंतिम सामन्यासह उर्वरित सामने लाहोरमध्ये खेळवण्यात येणार होते.

हे हि वाचाकसोटी आणि टी-20 एकत्रित करणारा क्रिकेटचा एक नवा फॉरमॅट; कधी होणार सुरु?

पाकिस्तानविरुद्ध खेळणार दोन सामने :

तिरंगी मालिकेतील अफगाणिस्तानचा पहिला सामना 17 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध, त्यानंतर 19 नोव्हेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध आणि दुसरा सामना 23 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार होता. श्रीलंकेविरुद्धचा सामनाही 25 नोव्हेंबर रोजी होणार होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts