ताज्या बातम्या

मुलीच्या पहिल्या वाढदिवशीचं काळाचा घाला

Palghar building collapse tragic incident

पालघर जिल्ह्यातील विरार येथे काल रमाबाई आपार्टमेंटची चार मजली इमारत अचानक कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक मलब्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. या इमारतीत चौथ्या मजल्यावर एका वर्षाच्या मुलीचा वाढदिवस साजरा केला जात होता. यात वाढदिवस असलेल्या मुलीचा आणि तिच्या वडिलांचा दुर्दैवी अंत झाला आहे. अजूनही घटनास्थळी अग्निशमन दल, तसेच स्थानिक प्रशासनाचे बचावकार्य सुरु आहे. या इमारतीच्या बिल्डर वर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts