Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • थरारक क्षण! नेपाळमध्ये लँडिंगदरम्यान विमानाच्या टायरला अचानक आग, 289 प्रवाशांचा जीव टांगणीला
Top News

थरारक क्षण! नेपाळमध्ये लँडिंगदरम्यान विमानाच्या टायरला अचानक आग, 289 प्रवाशांचा जीव टांगणीला

nepal
74

Nepal | नेपाळची (Nepal) राजधानी काठमांडूमध्ये (Kathmandu) मोठा अपघात घडला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंगदरम्यान एका विमानाच्या टायरला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेदरम्यान विमानात कर्मचारी सदस्यांसह 289 प्रवासी होते. तर या आपघातमुळे प्रवाशांमध्ये आणि संबंधित परिसरात घबराट पसरली आहे.

हेही वाचा – देशसेवेचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी! CRPF मध्ये मेगा भरती; जाणून घ्या पात्रता, जागा अन् अर्जाची तारीख

नेमकं घडलं काय?

काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका विमानाच्या टायरला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. तुर्की एअरलाइन्सचे विमान विमानतळावर उतरत असताना अचानक या विमानाच्या टायरला आग लागली. ही आग लागल्यानंतर ती तातडीनं विझवण्यात आली आणि विमानातील सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पोलिसांनी अपघाताबाबत दिली मोठी माहिती

या घटनेबाबत पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली.  विमानाच्या टायरला आग लागताच तातडीनं ती विझवण्यात आल्याची माहिची पोलिसांनी दिली आहे. विमानतळ सुरक्षा अधीक्षक राजकुमार सिलवाल यांनी सांगितलं की, “तुर्कीश एअरलाइन्सचे विमान टीके 726 इस्तंबूलहून काठमांडूला येत होते. लँडिंग करताना त्याच्या टायरला आग लागली. तर अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. तसेच सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे”,  अशी माहिती सिलवाल यांनी दिली.

अपघात झालेल्या या विमानात 278 प्रवासी आणि 11 कर्मचारी होते. या प्रवाशांमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या काही अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता. सुदैवाने, या अपघातातून सर्वजण सुरक्षित असून सर्वांना विमानातून सुखरूप बाहेर काढण्यात आले.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून विमान अपघातांच्या अनेक घटना घडल्या असून, त्यात अनेक लोकांचा जीव गेला आहे. अशातच आता नेपाळमध्ये विमानाच्या टायरला अचानक आग लागल्याने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts