• Home
  • राजकारण
  • पंतप्रधान मोदींकडून काझीरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉरची पायाभरणी; दोन अमृत भारत गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा
ताज्या बातम्या

पंतप्रधान मोदींकडून काझीरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉरची पायाभरणी; दोन अमृत भारत गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा

Kaziranga Elevated Corridor

Kaziranga Elevated Corridor : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस होता. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी 6957 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या काझीरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉरची पायाभरणी केली. हे कॉरिडॉर पूर्ण झाल्यावर या प्रदेशातील कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा होईल. यामुळं काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात पर्यटनाला चालना मिळेल आणि व्यापार आणि औद्योगिक विकासासाठी नवीन मार्ग खुले होतील. तरुणांना रोजगार मिळेल आणि नवीन संधी निर्माण होतील, ज्यामुळं या प्रदेशात लक्षणीय आर्थिक वाढ होईल. यासह त्यांनी दोन अमृत भारत एक्सप्रेसनांही हिरवा झेंडा दाखवला. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींचा एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत ईशान्येकडील राज्याचा हा दुसरा दौरा आहे.

दोन अमृत भारत गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा :

या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी दोन नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला, यात गुवाहाटी (कामाख्या)-रोहतक अमृत भारत एक्सप्रेस आणि दिब्रुगड-लखनऊ (गोमती नगर) अमृत भारत एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे. या नवीन रेल्वे सेवा ईशान्य आणि उत्तर भारतामधील रेल्वे कनेक्टिव्हिटी मजबूत करतील, ज्यामुळं सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास शक्य होईल.

₹6920 कोटी खर्चून बांधण्यात येणारा उन्नत कॉरिडॉर :

पंतप्रधान मोदी यांनी काझीरंगा उन्नत कॉरिडॉर प्रकल्पाचा (राष्ट्रीय महामार्ग 715 च्या कालियाबोर-नुमालीगड विभागाचे चार पदरी) भूमिपूजन समारंभ केला. 86 किलोमीटर लांबीचा काझीरंगा उन्नत कॉरिडॉर प्रकल्प हा पर्यावरणपूरक राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आहे. यात काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातून जाणारा 35 किलोमीटरचा उन्नत वन्यजीव कॉरिडॉर, 21 किलोमीटरचा बायपास विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग 715 च्या विद्यमान महामार्ग विभागाचा 30 किलोमीटरचा विस्तार, तो दोन पदरींवरुन चार पदरींमध्ये श्रेणीसुधारित करणं समाविष्ट असेल. या प्रकल्पाचं उद्दिष्ट उद्यानाची समृद्ध जैवविविधता जपणं आणि प्रादेशिक संपर्क व्यवस्था सुधारणं आहे.

सुधारित संपर्क व्यवस्था :

हा प्रकल्प नागाव, कार्बी आंगलोंग आणि गोलाघाट जिल्ह्यांमधून जाईल आणि अप्पर आसाम, विशेषतः दिब्रुगड आणि तिनसुकियाशी संपर्क व्यवस्था सुधारेल. हा उंचावरील वन्यजीव कॉरिडॉर प्राण्यांची अखंड हालचाल सुनिश्चित करेल आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करेल. यामुळं रस्ते सुरक्षा सुधारेल, प्रवासाचा वेळ आणि अपघात कमी होतील आणि प्रवासी आणि मालवाहतूक सुलभ होईल. या प्रकल्पांतर्गत, जाखलबंधा आणि बोकाखत इथं बायपास विकसित केले जातील, ज्यामुळं शहरांमधील गर्दी कमी होण्यास, शहरी गतिशीलता सुधारण्यास आणि स्थानिक लोकांचं जीवनमान सुधारण्यास मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts